प्रत्येक यशस्वी व श्रीमंत व्यक्ती ही सकाळी लवकर उठत असते. सकाळी लवकर उठून आपल्या दिनचर्येचे नियोजन करावे. सकाळी लवकर उठणे हे यश मिळवण्याचा प्रभावशाली मार्ग आहे. थॉमस कार्लीच्या मते ४४ टक्के श्रीमंत व्यक्ती कामाच्या वेळेच्या तीन तास लवकर उठतात. प्रत्येक श्रीमंत व यशस्वी व्यक्तीकडे पाहिल्यास प्रथम दर्शनी त्यांचे व्यक्तीमत्व व आरोग्य सुदृढ असल्याचे दिसून येते. यशस्वी व्यक्ती त्यांच्या आहाराच्या सवयीबाबत काटेकोर असतात.Do something different than others
बहुतांश यशस्वी लोक मद्यपान करत नाहीत. त्यामुळे त्यांचे आयुष्यमान दीर्घ, निरोगी व व्याधीरहित असते. आहारासोबतच फिट राहण्यासाठी व्यायाम किंवा योगा करणे महत्वाचे आहे. त्यासाठी आवर्जून वेळ काढत आरोग्यावर लक्ष हवे तरच आयुष्यात लक्ष गाठता येईल. त्याचप्रमाणे नेहमी इनोव्हेटीव राहण्याचा प्रयत्न करा. सतत नवनवीन कल्पना शोधण्यासाठी प्रयत्नशील रहा. जे इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्यासाठी मेहनत घेतात तेच यशस्वी होतात. आणि स्वत:ची वेगळी ओळख बनवतात.
उदा. मार्क झुकेनबर्ग, स्टीव्ह जॉब्स, संदीप माहेश्वरी, धिरूभाई अंबानी इत्यादी या प्रत्येकाने काहीतरी नावीन्यपूर्ण गोष्ट केली व त्यात यशस्वी झाले आज त्यांचे नाव ब्रॅंडनेम बनले आहे. आपली तीव्र आवड म्हणजेच पॅशन शोधा. ज्या गोष्टीत आपल्याला परम आनंद भेटतो अशी गोष्ट करा. अशा कल्पनांवर काम करा, ज्यात तुमचे लक्ष अधिक प्रभावपणे केंद्रीत होईल, उत्साह वाढेल व निश्चय दृढ होईल. कोणत्याही ध्येयाची सुरुवात करण्याआधी ती का करावी, याचे उत्तर आपल्याकडे असणे आवश्यक आहे,
कारण हेच उत्तर आपल्या यशाचा मार्ग व दिशा ठरवत असते. आयुष्यभर प्रश्नचिन्ह डोक्यावर घेऊन यशस्वी होता येत नसते. कधी कधी या का चे उत्तर सहजपणे मिळत नाही. हा का म्हणजेच आपली प्रेरणा किंवा आपले उच्च धेय असू शकते. तुम्ही काय करता याला महत्व नाही, तर तुम्ही एखादी गोष्ट का करता हे समजणे फार महत्वाचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App