विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आयफोनला आता थेट सॅटेलाइटचेच कनेक्शन


मोबाईल नेटवर्क  ही सध्याचा फार मोठी समस्या बनून राहिली आहे. मोबाईल नाही असा माणूस आता सापडणे मुश्कील झाले आहे. अशा वेळी सर्व मोबाईल युजर्सना चांगले नेटवर्क मिळून देण्यासाठी प्रत्येक कंपन्यांची शिकस्त चाललेली असते. पण दरवेळी नेटवर्क मिळतेच अशातला भाग नाही. त्यामुळे मोबाईल वापरणारे त्रासून जातात. मोबाईलला रेंज नसल्याने नेट सुरु झाले नाही, फन लागला नाही याचा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी आलेलाच असेल.Direct satellite connection to iPhone now

त्या आता जगप्रसिद्ध ॲपल कंपनीने भन्नाट मार्ग काढला आहे. कंपनी आपल्या जगभरातील ग्राहकांसाठी लवकरच आयफोन-१३ लाँच करण्याची शक्यता आहे. या आयफोनला थेट सॅटेलाइट कम्युनिकेशन कनेक्टिव्हीटी असेल त्यामुळे युजरना मोबाईल नेटवर्क नसले तरीसुद्धा संदेश पाठविता येतील तसेच कॉल करणेही शक्य होणार आहे. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत असणाऱ्या या उपग्रहाशी हा स्मार्टफोन कनेक्टेड असेल.

या फोनमध्ये थेट उपग्रहांशी कनेक्ट होण्याची क्षमता असल्याने त्याला फोर-जी अथवा फाईव्ह-जी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागणार नाही. क्वालकॉम एक्स६० बेसबँड चीपमुळे युजरना हा आयफोन वापरणे अधिक सुलभ होईल. कारण तो थेट उपग्रहाच्या संपर्कात राहील. दरम्यान नव्या फोनला आयफोन-१३ असे नाव देण्याऐवजी ते आयफोन-२०२१ असे असू शकते.

याआधी अनेक युजरनी देखील ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये देखील हीच मागणी केली होती. अनेकदा डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्ये गेल्यानंतर रेंजची समस्या येते. पण नव्या आयफोनमुळे ती देखील चुटकीसरशी सुटणार आहे. स्मार्ट स्पीकरसारखे नवे डिव्हाईस देखील बाजारात आणण्याचा ॲपलचा विचार असून चालकविरहीत स्मार्ट कारच्या निर्मितीवर देखील कंपनीचे काम सुरू आहे.

Direct satellite connection to iPhone now

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात