विशेष प्रतिनिधी
परळी : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद काही महिन्यांनतर पुन्हा एकदा विकोपाला गेला आला आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर लावलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्यासाठी परळीत पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्या परळीत पोहचल्या. मात्र पोलिसांनी पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या मुलासह स्थानबद्ध केले आहे.Dhananjay mundhe: Karuna Munde finally admitted to Parli after threatening to burn alive
दोन दिवसांपुर्वी करुणा मुंडे यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत आपण परळीत सासरी येऊन अनेक गोष्टींचा पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचे जाहीर केले होते. आपल्याला जीवे मारण्याच्या, जिवंत जाळण्याच्या धमक्या येत असल्या तरी आपण परळी येऊन पत्रकार परिषद घेणारच असेही त्यांनी ठणकावून सांगितले होते.
दुपारी दोन वाजता करूणा मुंडे आपल्या मुलासह परळीत दाखल झाल्या. परंतु तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रंचड बंदोबस्त तैनात केला होता.
करुणा मुंडे परळीत दाखल होताच पोलिसांनी त्यांना मुलासह स्थानबद्ध केले. दरम्यान, याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले आहेत. यावेळी त्यांनी करुणा मुंडे मुर्दाबादच्या घोषणा देखील दिल्या.
पोलिसांनी पत्रकार परिषदेच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावला होता. यात महिला पोलीसांची संख्या अधिक होती.
दरम्यान, करुणा मुंडे यांच्यावर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी अँट्राँसिटीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्या परळीत तणावाचे वातवरण असून पोलिसांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App