शिवसेना हा आता बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष राहिला नाही. शिवसेनेने आता हिंदुत्व सोडलं आहे. आता ती सुडो सेक्युलर झाली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : शिवसेना हा आता बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष राहिला नाही. शिवसेनेने आता हिंदुत्व सोडलं आह. आता ती सुडो सेक्युलर झाली आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. devendra fadnavis news
शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या अजान स्पर्धेसंदर्भात दिलेल्या सल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चचेर्चा विषय ठरला आहे. यावरुनच देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना हा पक्ष आता बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष राहिला नाही असं म्हटलं आहे. devendra fadnavis news
फडणवीस म्हणाले की, शिवसेना आता व्होट बँकेचं राजकारण करते आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा शिवसेनेने नाकारली आहे. पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धेचे आयोजन केले, याबाबत आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी बोललं पाहिजे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरे कायमच बोलत राहिले आणि लढत राहिले. बाळासाहेब ठाकरेंनी सामनात लिहिलेल्या लेखांच्या अगदी उलट भूमिका आता शिवसेनेने घेतली आहे. शिवसेना हा पक्ष आता बाळासाहेब ठाकरेंचा राहिला नाही.
आम्ही कधीही मुस्लिम समाजाकडे व्होट बँक म्हणून पाहिलेले नाही, असे सांगून फडणवीस म्हणाले की, आम्हाला तुष्टीकरणाचे राजकारण नको. सबका साथ, सबका विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा आहे. यामध्ये मुस्लिम समाजही येतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App