मुंबई हायकोर्टाचा निर्णय राज्य सरकारला चपराक, देवेंद्र फडणवीस यांची टीका

मुंबई हायकोर्टाने दिलेला आदेश ही राज्य सरकारला मोठी चपराक आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच आरेतील जागेला मंजुरी दिलेली आहे. यामुळे आता तरी अहंकार सोडून आरेमध्येच काम करावे लागणार आहे. अधिवेशनातदेखील मी हीच भूमिका मांडली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी मिठाचा खडा का टाकता, असे वक्तव्य केले. पण आता तुम्हीच मुंबईच्या विकासात खडा टाकत आहात, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Devendra Fadnavis criticize the decision of Mumbai High Court

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई हायकोर्टाने दिलेला आदेश ही राज्य सरकारला मोठी चपराक आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच आरेतील जागेला मंजुरी दिलेली आहे. यामुळे आता तरी अहंकार सोडून आरेमध्येच काम करावे लागणार आहे. अधिवेशनातदेखील मी हीच भूमिका मांडली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी मिठाचा खडा का टाकता असे वक्तव्य केले. पण आता तुम्हीच मुंबईच्या विकासात खडा टाकत आहात, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Devendra Fadnavis criticize the decision of Mumbai High Court

कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने दिले असून ठाकरे सरकारला मोठा दणका दिला आहे. परिस्थिती जैसे थे ठेवा असे आदेश न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी फेब्रुवारीत होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, न्यायालयाच्या दणक्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करायला नको. मुंबईच्या विकासासाठी ही कामे करायला हवीत. मेट्रोच्या कामासाठी लाणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचे काम त्वरित सुरू केले नाही तर प्रकल्प 2024 पर्यंत लांबेल. राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अट्टाहास का आहे?

‘कांजूरमार्ग कारशेडप्रकरणी जेवढा उशीर करण्यात येईल, तितका खर्च वाढणार आहे. याच कारणामुळे मुंबईकरांवरच त्याचा आर्थिक भार येणार आहे. राज्य सरकारने आपला अहंकार सोडून द्यावा आणि जनतेचे नुकसान करू नये, असेही फडणवीस म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे हे एखाद्या पक्षाचे प्रमुख नाहीत. ते मुख्यमंत्री आहेत. एका संविधानिक पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी कायदेशीर बाब समजून घेतली पाहिजे आणि मग पुढे जावे असेही फडणवीसांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कांजूरमार्गची जागा मेट्रोला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या निर्णयानंतर ठाकरे सरकारने माफी मागावी आणि आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Devendra Fadnavis criticize the decision of Mumbai High Court

उद्धव ठाकरे सरकारला मेट्रो कारशेडची अनधिकृत ऑर्डर मागे घ्यावी लागली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी आणि आदित्य ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. कारशेडच्या जागेच्या वादामुळे मेट्रो प्रकल्प रखडणार आहे. त्यासाठी 5 हजार कोटींचा अधिक खर्च आणि पाच वर्षांचा अधिक काळ लागणार आहे. त्यासाठी जबाबदार कोण असणार?’ असा सवालही त्यांनी यावेळी केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*