२७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एमआयएमच्या रॅलीला परवानगी नाकारली ; इम्तियाज जलील यांनी ट्विट करत व्यक्त केली नाराजी


ओवेसी यांनी शहरातील पत्रकार परिषदेत जाहीर केले की , मुस्लिम आरक्षणासाठी तिरंगा झेंडा हातात घेऊन एमआयएम दुचाकी रॅली काढणार आहे.Denied permission for MIM rally on November 27; Imtiaz Jalil expressed his displeasure by tweeting


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद :मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम पक्षाच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी मुंबईत तिरंगा रॅली काढण्यात येणार होती.मात्र यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. याबाबत खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.

इम्तियाज जलील म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रॅलीला परवानगी दिली जाते. त्याचवेळी आमच्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रॅलीला परवानगी नाकारली जाते. याबाबत महाराष्ट्र सरकार स्पष्टीकरण देऊ शकेल का? कृपया उत्तर द्या. असे म्हणत खा. इम्तियाझ जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना टॅग करीत उत्तर मागितले आहे.ओवेसी यांनी शहरातील पत्रकार परिषदेत जाहीर केले की , मुस्लिम आरक्षणासाठी तिरंगा झेंडा हातात घेऊन एमआयएम दुचाकी रॅली काढणार आहे. मात्र सरकारने या रॅलीची परवानगी नाकारली आली आहे.

Denied permission for MIM rally on November 27; Imtiaz Jalil expressed his displeasure by tweeting

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण