दोन कोटी लोकसंख्येची दिल्ली चालविता येईना, म्हणे उत्तर प्रदेशात लढणार, आम आदमी पक्षावर टीका

दोन कोटी लोकसंख्या असलेली दिल्ली सांभाळली जात नाही. तर दुसरीकडे २४ कोटी लोकसंख्या असलेलं उत्तर प्रदेश सांभाळण्याच्या गोष्टी सुरू आहेत. ही गोष्ट करणारा पक्ष स्वप्नच पाहत आहे, असा टोला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आम आदमी पक्षाला लगवाला आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दोन कोटी लोकसंख्या असलेली दिल्ली सांभाळली जात नाही. तर दुसरीकडे २४ कोटी लोकसंख्या असलेलं उत्तर प्रदेश सांभाळण्याच्या गोष्टी सुरू आहेत. ही गोष्ट करणारा पक्ष स्वप्नच पाहत आहे, असा टोला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आम आदमी पक्षाला लगवाला आहे.  Delhi which has a population of two crore cannot be run

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष हा उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका लढणार असल्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत.

आम आदमी पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात प्रत्येक पक्षाचं सरकार आलं. परंतु त्यांनी आपली घरं भरण्याशिवाय उत्तर प्रदेशसाठी काहीही केलं नाही. आज छोट्या छोट्या सुविधांसाठी उत्तर प्रदेशच्या नागरिकांना दिल्लीत का यावं लागतं? असा प्रश्न केजरीवाल यांनी केला आहे.

आम आदमी पक्षाच्या या निर्णयावर चांगलीच टीका होत आहे. केवळ दोन कोटी लोकसंख्या असलेल्या दिल्लीत अनेक प्रश्न आहेत. तीनही महापालिकांच्या महापौरांना आणि पदाधिकाऱ्यांना थकित निधी मिळावा यासाठी धरणे आंदोलनाची वेळ आली आहे.

परिचारिकांचे पगार करण्यासही राज्य सरकारकडे पैसे नाहीत. याला केवळ आप आणि अरविंद केजरीवाल यांचे चुकीचे व्यवस्थापन कारणीभूत आहे. त्यांना दिल्ली सांभाळता येत नाही आणि आता उत्तर प्रदेशात जाण्याची भाषा करत आहे, अशी टीका केली जात आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*