विशेष प्रतिनिधी
मुंबई : दीपिका पदूकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि भारती सिंगला जामीन मिळवून देण्यात “मदत” करणारे एनसीबीचे दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोघींच्या जामीन अर्जावर सुनावणी होताना हे अधिकारी आणि त्यांची छोटी टीम फक्त कोर्टात गैरहजर राहिली. त्यामुळे जामीनअर्जावर एनसीबीने विरोध केला नसल्याचे स्पष्ट होत होते. कोर्टाने त्या दोघींचा जामीनअर्ज मंजूर केला. deepika padukon news
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे हे दोन अधिकारी बॉलिवूडमधील इतर ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीत सहभागी होते. या दोन अधिकाऱ्यांना संशयास्पद भूमिकेसाठी निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिले होते. deepika padukon news
एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपास अधिकाऱ्यांपैकी एकाने अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या प्रकरणात सिक्युअर बेलमध्ये आणि आणखी एक तपास अधिकाऱ्याने कॉमेडियन भारती सिंगच्या प्रकरणात संशयास्पद भूमिका घेतल्याचे आढळले.
त्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांच्या जामिनादरम्यान एनसीबीची टीम न्यायालयात हजरच राहिली नाही. त्यांच्या जामिनाला एनसीबीने विरोध देखील केला नाही. त्यामुळे हर्ष आणि भारती सिंग यांना जामीन मिळणे सोपे गेले. या प्रकरणात एनसीबीला एनडीपीएस कोर्टाकडे अपील करावे लागले. खालच्या कोर्टाने दिलेला जामीन आणि भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचा ड्रग्समध्ये असलेला सहभाग लक्षात घेऊन त्यांचा जामीन रद्द करावा. या प्रकरणावर पुढील आठवड्यात सुनावणी आहे.
एनसीबीच्या छापा दरम्यान दीपिका पदुकोणच्या मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्या घरी ३ सीबीडी तेल आणि गांजा जप्त करण्यात आला, त्यानंतर अटक टाळण्यासाठी तिने अटकपूर्व जामिनाकरता अर्ज केला होता. तिचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे. याही प्रकरणात तपास अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आढळली आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App