Cyclone Gulab : तौक्तेच्या तडाख्यानंतर महाराष्ट्रावर आता ‘गुलाबी’ संकट! बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ दाखल ; कोणत्या जिल्ह्यांत जाणवणार परिणाम?

  • महाराष्ट्रातून कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. व्हायरसची आपत्ती संपत नाही तोच आता नैसर्गिक आपत्ती समोर आ वासून उभी राहिली आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई: महाराष्ट्रात नुकतंच तौक्ते वादळ आलं होतं आता परत एक वादळ महाराष्ट्रात प्रवेश करत आहे.या वादळाच नाव आहे गुलाब चक्रीवादळ. गुलाब चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओरीसा किनारपरट्टीला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.Cyclone Gulab: ‘Pink’ crisis in Maharashtra-Cyclone hits Bay of Bengal; In which districts will the effect be felt?

याआधी आलेल्या तौक्ते वादळाचा फटका आपण पाहिलाच आहे. आता गुलाब या वादळाचा फटका महाराष्ट्राला कसा बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुलाब हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झालं आहे. गुलाब चक्रीवादळ बंगालच्या उपसगारात दाखल झालं आहे. आंध्र प्रदेश, द ओरिसा किनारापट्टीला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला.

26 सप्टेंबर म्हणजेच रविवारी संध्याकाळी आंध्र प्रदेश, ओरीसा किनारपट्टी या ठिकाणी धडकू शकतं. महाराष्ट्रासाठी पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे असं ट्विट के. एस. होसाळीकर यांनी केलं आहे.

 

हवामान खात्यानं या वादळाला गुलाब असं नाव दिलं आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हे चक्रीवादळ सक्रीय राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आंध्रप्रदेशातील उत्तरेचा भाग आणि ओदिशातील दक्षिणेचा भाग यांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुढील काही तासात वादळाचा वेग वाढणार असल्याने हवामान खात्याने आंध्रप्रदेश आणि ओडिशात यलो अलर्ट जारी केला आहे.

26 सप्टेंबरपर्यंत कलिंगपट्टनम भागात यामुळे जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

 

Cyclone Gulab: ‘Pink’ crisis in Maharashtra-Cyclone hits Bay of Bengal; In which districts will the effect be felt?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात