वृत्तसंस्था
तिरुअनंतपुरम : केरळ राज्यांत विधानसभा निवडणुकीनंतर आता जनहिताच्या कामांना वेग आला आहे. नुसती तोंड पाटीलकी न करता कृतीशीलतेची जोड देण्यात नवे सरकार यशस्वी होत असल्याचे दिसते. सरकारने स्वतः कोविशिल्ड लस पुण्यातून खरेदी केली. त्या लशीची पहिली खेप आज केरळात आली. लशीचे बॉक्स कोची विमानतळावर आज उतरवून घेण्यात आले आहेत. Covishield purchased directly from Pune The first batch of vaccine arrived in the state of Kerala
लस पुरवठा नाही तर मग आम्ही ती जनतेला कशी द्यायची, असा आकांडतांडव काही राज्ये करत आहेत. दुसरीकडे केरळ सारखे लहान राज्य जनतेला लस तातडीने मिळावी, यासाठी स्वतः प्रयत्न करत असल्याचे या उदाहरणातून स्पष्ट दिसत आहे.
राज्य सरकारने ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून थेट खरेदी केली असून त्याचे बॉक्स कोची येथील विमानतळावर केरळच्या अधिकाऱ्यानी उतरवून घेतले आहेत. आता लस राज्यात पोचली असल्याने लसीकरणाला राज्यात वेग येणार आहे. तसेच सर्वाना लस मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App