विशेष प्रतिनिधी
मुंबई – डॉक्टरांवरील हल्ले आणि रुग्णांच्या उपचारांबाबत केल्या जाणाऱ्या फिर्यांदीचा तपास करण्यासाठी पोलिसांचा विशेष विभाग स्थापन करण्याचा विचार करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. Court directs govt for doctors security
सध्याच्या काळात डॉक्टरांना संरक्षण मिळण्याची आणि असे हल्ले रोखण्याची आवश्यकता आहे. सायबर गुन्हे, अमली पदार्थ, आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विभागात तज्ज्ञ पोलिस नियुक्त केले जातात, त्याप्रमाणे नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या विशेष विभागात वैद्यकीय ज्ञान असलेल्या पोलिसांची नियुक्ती व्हायला हवी, असे खंडपीठ म्हणाले. राज्य सरकार या सूचनेचा विचार करेल, असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले.
कोरोना संसर्गातदेखील डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी डॉक्टरांच्या वतीने याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App