तळेगाव दाभाडे येथील मायमर संचलित डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णाने स्टोअर रूममध्ये टेलिफोन वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. Corona positive committed suicide in Hospital
प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे येथील मायमर संचलित डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णाने स्टोअर रूममध्ये टेलिफोन वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सोमनाथ तुकाराम हुलावळे (४४, रा.कार्ला,ता. मावळ, जि.पुणे) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद हुलावळे म्हणाले,सोमनाथ हुलावळे यांच्या आत्महत्येस रुग्णालय व्यवस्थापनाचा गलथान कारभार आणि हलगर्जीपणाच कारणीभूत आहे. रुग्णालयात आत्महत्तेसारखा प्रकार घडेपर्यंत रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी काय झोपले होते का? रुग्णालय व्यवस्थापनावर कडक करवाई करण्यात यावी.
आपल्या चुलत्याच्या मृत्युस मायमर हॉस्पिटल प्राशसन जबाबदार असल्याचा आरोप दिनेश हनुमंत हुलावळे यांनी केला आहे. सोमनाथ हुलावळे यांना शनिवारी (दि.१मे) रोजी मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
कोविडच्या अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर उपचार सुरू होते. या ठिकाणी अतिदक्षता विभागात एकूण १९रुग्णांवर उपचार सुरू होते. सोमनाथ हुलावळे यांनी अतिदक्षता विभागातील नजीकच्या स्टोअर रूममध्ये फॅनच्या हुकाला टेलिफोन वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App