आपण गावाला जाताना जसे सर्व पैसे एका पिशवीत किंव बॅगमध्ये ठेवत नाही. थोडे थोडे पैसे सर्व बॅगमध्ये ठेवतो जेणेकरून जर एखादी बॅग चोरीला गेली तर फक्त काही पैसे चोरीला जातील. गुंतवणुकीच्या बाबतीतही तसेच करायचे, पैसे थोडे थोडे वेगवेगळ्या जागी गुंतवावे. विभाजन केल्यामुळे धोका कमी होतो. Consider investing while spending
पण एवढेही जास्त विभाजन करू नका कि तुम्हाला येणारा परतावा कमी होईल. संयमाचा अभाव. गुंतवणूक करणे साधं आहे पण सोपं नक्कीच नाही असे प्रख्यात गुंतवणूकतज्ञ वॉरेन बफे यांनी म्हटलं आहे. कारण गुंतवणुकीचे फायदे आज नाही, अनेक वर्षांनी मिळतात. गुंतवणूक करायला माणसाला शिस्त लागते.
आपल्याला शाळेत कधी श्रीमंत कसे व्हावे हा विषय शिकवला का? मग शाळेतून बाहेर पडल्यावर आपण गुंतवणुकीबद्दल शिकायला काय मेहनत घेतली? पैसे कसे कमवायचे यासाठी आपण बहुतेक लोक किमान १५ वर्ष तरी शिकलो. पण कमावलेले पैसे कसे गुंतवूण मोठे करावे, ह्याचा किती दिवसांचा अभ्यासक्रम आपण केलाय?
गुंतवणूकदार व्हायला तुम्हाला स्वतःला, स्वतःवर काम कराव लागते. स्वतः काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. काही चुकीच्या गोष्टी सोडून द्याव्या लागतील. ह्या गोष्टी सर्व लोक करू शकतात. पण करत नाहीत, त्यामुळेच जगात फक्त थोडे लोक श्रीमंत आहेत. समजा आज तुम्ही वीस हजारांच्या जागी तीस हजारांचा मोबाईल घेतला तर तुम्हाला वाटेल काय झाल? फक्त दहा हजारच तर जास्त गेले? पण वॉरेन बफे असा विचार करत नाहीत तर ते असा विचार करतात कि, या दहा हजारांचे भविष्यात किती झाले असते? माझं नुकसान तेवढ झालं आहे.
म्हणजे आज गमावलेले दहा हजार हे भविष्यातील सोन्यात गमावलेले ७२,०००, मुदत ठेवीतील ९९ हजार, पोस्टातील १.०७ लाख, तर सेन्सेक्स मध्ये २.३८ लाख आहेत. पैसे खर्च करताना जर का विचार केला कि हे पैसे गुंतवले तर किती मोठे होतील तर फालतू खर्च करणे बंद करणे सोपे होईल. असा विचार दरवेळी करणे आणि वाचलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे यातून माणूस श्रीमंत होतो हे नक्की.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App