विशेष प्रतिनिधी
मुंबई: शरद पवारांनी सत्तेत मित्रपक्ष असणार्या कॉंग्रेसवर सणसणीत टिप्पणी केली यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.शरद पवार हे राजकारणातले दिग्गज नेते आहेत. त्यांच्या मताबाबत मी फार काही म्हणणार नाही मात्र काँग्रेसने अनेकांना जमीन राखायला दिली आणि त्यांनीच त्यावर डाका घातला .CONGRESS VS NCP: Congress allowed many to retain land; Some robbed – Nana Patole’s retaliation against Sharad Pawar
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
काँग्रेसने अनेक लोकांना जमीन राखायला दिली. मात्र ज्यांना राखण्यासाठी जमीन दिली त्यांनीच डाका घातला किंवा चोरी केली, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असं शरद पवार यांना म्हणायचं असेल असं म्हणत नाना पटोले यांनी शरद पवारांना एका अर्थाने टोलाच लगावला आहे. दुसऱ्या पक्षाबाबत त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नको असं म्हणत त्यांनी काहीशी नाराजीही व्यक्त केली. एवढंच नाही तर 2024 ला पंतप्रधानपदी काँग्रेसचाच नेता बसणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शरद पवार हे सुरूवातीपासून काँग्रेसमध्ये होते. पुलोदचा प्रयोग आणि त्यानंतर काही वर्षांनी सोनिया गांधींना विरोध दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेसची केलेली स्थापना या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला ठाऊक आहेत. कदाचित नाना पटोले यांचा अंगुलीनिर्देशही तिथेच असावा. TV9 मराठी या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
‘मागे मी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या.
पण हवेली आहे, तशीच आहे. पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनीची आता १५-२० एकरवर आलीय. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही.’
यावरच पवारांना म्हणजे काँग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झालीय का, असं विचारण्यात आलं. तेव्हा पवार म्हणाले, ‘तिथंक काही मी म्हणत नाही. एकेकाळी काँग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती. पण ती होती. आहे नाही. होती हे मान्य केलं पाहिजे. मग (विरोधी पक्ष) जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App