विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आसाममधल्या मातब्बर नेत्या माजी खासदार सुष्मिता देव यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाल्याचे पहावयास मिळत आहे .त्यांच्या राजीनाम्यानंतर कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा थेट कॉंग्रेस हायकमांडवर निशाना साधत त्यांना घरचा आहेर दिला आहे .सोबतच महाभारतातील एका खास पात्राची उपमा देखील दिली आहे …Congress Vs Congress-Eyes Wide Shut ! Sushmita Deo leaves Congress-Kapil Sibal targets High Command; Comparison of Gandhi family with this character of ‘Mahabharata’ …
कपिल सिब्बल म्हणजे त्या 23 वरिष्ठ काँग्रेस नेत्यांपैकी एक ज्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाच्या हायकमांडच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या 23 नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि मनीष तिवारी आहेत, त्याशिवाय पी. चिदंबरम, जे गांधी कुटुंबाचे निकटवर्ती मानले जातात आणि त्यांनी मनमोहन सिंग सरकारमध्ये गृह आणि वित्त सारखी महत्त्वाची खाती हाताळली आहेत.
कपिल सिब्बल यांनी ट्विट करून हायकमांडला प्रश्न विचारला आहे. त्याचबरोबर गांधी घराण्याची तुलना महाभारतातील धृतराष्ट्राशी केली आहे. कपिल सिब्बल यांनी पहिल्यांदाच गांधी घराण्यावर इतक्या तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
कपिल सिब्बल यांनी ट्विटरवर लिहिले, ‘सुष्मिता देव यांनी आमच्या पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडले आहे. एकीकडे तरुण नेते निघत आहेत आणि आम्ही वृद्ध नेते पक्ष बळकट करू इच्छितो, मग आमच्यावरच आरोप होतो. पक्ष पुढे जात आहे, परंतु पूर्णपणे बंद डोळ्यांनी.
Sushmita Dev Resigns from primary membership of our Party While young leaders leave we ‘oldies’ are blamed for our efforts to strengthen it The Party moves on with : Eyes Wide Shut — Kapil Sibal (@KapilSibal) August 16, 2021
Sushmita Dev
Resigns from primary membership of our Party
While young leaders leave we ‘oldies’ are blamed for our efforts to strengthen it
The Party moves on with :
Eyes Wide Shut
— Kapil Sibal (@KapilSibal) August 16, 2021
भावी पिढ्या आपल्यासारख्या वृद्ध नेत्यांना यासाठी दोष देतील ,असा इशारा कपिल सिब्बल यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिला आहे.एकूणच सुष्मिता देव यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता असल्याचे स्पष्ट होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App