काँग्रेसी काळातील १०४ निवृत्त अधिकाऱ्यांचा मोदींनंतर योगींवर उपदेशाचे “लेटर मिसाइल”; लव्ह जिहादचा कायदा मंजूर केल्याने व्यक्त केली मळमळ


योगींनी राज्यात लव्ह जिहादविरोधातील कायदा मंजूर करवून घेताच काँग्रेसी काळातील अतिवरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी योगींना राज्य घटनेचा पुन्हा अभ्यास करण्याचा सल्ला देणारे पत्र लिहिले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना असहिष्णुता, राज्य घटना, गंगा – जमनी तहजीब या मुद्द्यांवरून धडे “शिकवून” झाल्यानंतर देशातले काँग्रेसी काळातले अतिवरिष्ठ सनदी टीएके नायर, शिवशंकर मेनन, निरूपमा राव आदी अधिकारी आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या मागे लागले आहेत. योगींनी राज्यात लव्ह जिहादविरोधातील कायदा मंजूर करवून घेताच काँग्रेसी काळातील अतिवरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी योगींना राज्य घटनेचा पुन्हा अभ्यास करण्याचा सल्ला देणारे पत्र लिहिले आहे. Congress retired officer Law of Love Jihad news

या पत्रावर काँग्रेसी काळातील पंतप्रधानांचे सल्लागार टीएके नायर, परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन आणि निरूपमा राव यांच्यासह १०४ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे सगळे अधिकारी काँग्रेसच्या राजवटीत अतिवरिष्ठ पदांवर दिल्लीत राहिले आहेत. त्याच बरोबर मोदी सरकारच्या आक्रमक संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाला त्यांचा विरोध आहे.

मोदी त्यांना ओलांडून पुढे निघून गेले आहेत. त्यांच्यावर असले वैचारिक अँटॅक करून त्यांच्यात काही फरक पडलाच नाही. उलट संरक्षण आणि परराष्ट्र धोरण अधिक शार्प झाले. त्यामुळे मोदी हे टार्गेट सोडून या अधिकाऱ्यांनी योगींचे नवे टार्गेट निवडून त्यांच्या दिशेने हे पहिले लेटर मिसाइल डागले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी १०४ सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी पत्र लिहून ‘लव्ह जिहाद’ कायद्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘लव्ह जिहाद’ कायद्यामध्ये बळजबरीने धर्मांतर केल्यास कारागृहात पाठवण्याची आणि दंडाची तरतूद केली आहे.

त्यावर चिंता व्यक्त करताना अधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात मोराबादमध्ये अटक करण्यात आलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. हिंदू तरुणीशी विवाह केल्यामुळे मोरादाबादमध्ये दोन मुस्लीमधर्मीय भावांना पोलिसांनी अटक केली होती. यादरम्यान तरुणीचा गर्भपात झाला. पत्रामध्ये तरुणीने आपल्या आपल्या संमतीने मुस्लीम व्यक्तीशी लग्न केले असतानाही बजरंग दलाकडून ‘लव्ह जिहाद’ असा आरोप केल्याचा उल्लेख आहे.

“जन्माला येण्याआधीच एका निर्दोष बालकाची झालेली ही हत्या नाही का? तुमच्या राज्यातील पोलीस यासाठी जबाबदार नाहीत का?,” अशी विचारणा अधिकाऱ्यांनी पत्रातून केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना अजिबात वेळ न दवडता लोकांच्या हक्कांची माहिती देणारे प्रशिक्षण दिले पाहिजे. तुमच्यासहित उत्तर प्रदेशातील राजकीय नेत्यांनाही हे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आपण आणि इतर लोकप्रतिनिधींना शपथ घेतलेल्या घटनेतील तरतुदींविषयी स्वतःला पुन्हा एकदा शिक्षित करण्याची आवश्यकता आहे,” अशा शब्दात काँग्रेसी राजवटीतील अधिकाऱ्यांनी योगींना सुनावण्याचा प्रयत्न केला आहे.“

आमच्या पत्रामुळे जनमत एकत्र करण्यास आपल्याला मदत होईल. न्यायालय मध्यस्थी करुन हे अनुचित प्रकार थांबतील अशी आम्हाला आशा आहे, असा दावाही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. लव्ह जिहाद कायदा तयार करण्यात आल्यापासून उत्तर प्रदेश पोलीस दररोज एका व्यक्तीला अटक करत आहे. आतापर्यंत पोलिसांनी ३५ जणांना अटक केली आहे. याशिवाय एक डझनहून अधिक एफआयआर दाखल आहेत. कायद्यात १० वर्षांच्या जेलची तरतूद आहे.

Congress retired officer Law of Love Jihad news

कोण आहेत शिवशंकर मेनन, निरूपमा राव…
शिवशंकर मेनन आणि निरूपमा राव हे दोघेही डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात परराष्ट्र सचिव होते. राजीव गांधींच्या काळातील परराष्ट्र सचिव जे. एन. दीक्षित यांचे शिवशंकर मेनन हे जावई आहेत. निरूपमा राव या अमेरिका, चीनमधील राजदूत होत्या. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातील बचावात्मक परराष्ट्र धोरणाच्या त्या कार्यवाहक मानल्या जातात.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात