कर्नाटकात गोहत्या प्रतिबंधक विधेयक मांडण्यापूर्वी काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना आसनावरून खाली खेचले

  • येडियुरप्पा सरकारला विधेयक मांडण्यापासूनच रोखण्याचा डाव

वृत्तसंस्था

बेंगळुरू : कर्नाटक विधान परिषदेमध्ये काँग्रेस आमदारांनी मग्रुरी दाखवत मंगळवारी उपसभापतींना सभापतीच्या आसनावरून खाली खेचले आणि विधान परिषदेमध्ये गोहत्या प्रतिबंधक विधेयक सादर करण्यात अडथळा आणला. येडियुरप्पा सरकारने विधान सभेत हे विधेयक मंजूर करवून घेतले आहे. ते आज विधान परिषदेत सादर करण्यात येणार होते. परंतु, ते सादर करण्यात अडथळा निर्माण करण्याची स्ट्रॅटेजी आखून काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना वेगळ्याच मुद्द्यावर विरोध करून खाली खेचले. Congress MLCs in Karnataka Assembly forcefully remove 

 

सभागृहाचे कामकाज चालू होताच विधानपरिषदेतील काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना जबरदस्तीने खुर्चीवरुन खेचून बाहेर काढले. उपसभापतींनी सभापतींच्या आसनावर बसणे असवैधानिक असल्याचा अजब दावा या कारवाईसाठी करण्यात आला. प्रत्यक्षात गोहत्या प्रतिबंधक विधेयक सरकारला मांडताच येऊ नये यासाठी हा आटापिटा करण्यात आला.


संजय राऊत यांचे ट्विट चौर्यकर्म उघड? सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांचे ट्विट चोरल्याचा दावा


सरकारने गोहत्या प्रतिबंधक विधेयक मांडले असते तर काँग्रेसला विशिष्ट भूमिका घ्यावी लागली असती. परंतु, ती घेणे राजकीय दृष्ट्या शक्य नव्हते म्हणून संविधानिक – असंविधानिक अशा वेगळ्याच मुद्द्यावर वाद काढून काँग्रेस आमदारांनी सभागृहात गदारोळ केला आणि उपसभापतींना आसनावरून बळजबरीने खाली खेचून बाहेर काढले.

 

 

अखेर हाऊसमधील मार्शल्सना हस्तक्षेप करावा लागला.

 

उपमुख्यमंत्री अश्वथानारायण आणि काँग्रेस आमदारांमध्ये वादावादी सुरु झाली. काँग्रेसने विधान परिषदेच्या सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला होता. गोहत्या बंदी विधेयकाविरोधात काँग्रेसला मतदान हवे होते. काँग्रेसला विधेयकाविरोधात मतदान करायचे होते. तर मंजुरीआधी जेडीएसला ते विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठवायचे होते.

 

“काही आमदारांनी गुंडागिरी केली. त्यांनी उपसभापतींना जबरदस्तीने खुर्चीवरुन खेचलं. त्यांच्याशी गैरवर्तन केले. विधान परिषदेच्या इतिहासात इतका लाजिरवाणा दिवस आम्ही बघितलेला नाही. लोक आमच्याबद्दल काय विचार करतील, तो विचार करुन मला लाज वाटते” अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार लेहर सिंह सिरोया यांनी व्यक्त केली.

Congress MLCs in Karnataka Assembly forcefully remove

काँग्रेस आमदार प्रकाश राठोड यांनी मात्र भाजपावर टीका केली. “भाजपा आणि जेडीएसने सभापतींना बेकायदा पद्धतीने खुर्चीवर बसवले. भाजपा अशा असंवैधानिक पद्धतीने वागतेय हे दुर्देवी आहे. आम्ही त्यांना खुर्चीवरून उतरायला सांगितले होते. पण ते बेकायदेशीररित्या तिथे बसले असल्याने आम्ही त्यांना तिथून हटवावे लागले,” असा दावा प्रकाश राठोड यांनी केला.