विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस जागी झाली. बऱ्याच दिवसांनी मिटिंग घेतली. अनेक दिवसांनी काँग्रेस नेत्यांचा ताफा १० जनपथकडे वळला. बऱ्याच नेत्यांच्या अलिशान गाड्यांचा ताफा आल्याने १० जनपथवर चहल पहल दिसायला लागली. congress meeting held
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पत्रकारांना बाईट देताना म्हणाले देखील, की आम्ही काँग्रेस पक्षाच्या भवितव्याविषयी चर्चा केली. ती अतिशय सकारात्मक आणि पक्ष बांधणीच्या दृष्टीने महत्त्वाची होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेते बैठकीला हजर होते. congress meeting held
आम्ही पक्षाच्या सध्याच्या स्थितीवर चर्चा केली आणि पक्ष संघटना कशी बळकट करायची यावर विचार विनिमय केला. १० जनपथमध्ये काही तास चाललेल्या बैठकीनंतरचे पृथ्वीराज चव्हाण यांचे हे स्टेटमेंट होते.
१० जनपथकडे जाताना ज्यांच्या अलिशान गाड्या दिसल्या, त्यामध्ये अशोक गेहलोत, गुलामनबी आझाद, आनंद शर्मा, भूपिंदर सिंह हुड्डा, अंबिका सोनी आणि पी. चिदंबरम हे नेते होते. पृथ्वीराज चव्हाण पत्रकारांना बाईट देताना उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिष रावत होते.
इकडे १० जनपथवर सोनिया गांधींनी मिटिंग सुरू करण्याची बातमी येत असतानाच तिकडे राहुल गांधींनी एनएसयुआयच्या कामात आग्रहपूर्वक आणलेल्या रूची गुप्ता हिने एनएसयुआयचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्याचा मेसेज तिने एनएसयुआयच्या कार्यकारिणीच्या ग्रुपवर फिरवला. एनएयसुआयची मिटिंग बऱ्याच दिवसांत कोणी घेतली नाही.
संघटनेच्या नियुक्त्या बऱ्याचदिवसांपासून पेंडिंग आहेत. कोणी कोणाच्या सूचना पाळाव्यात हे कोणाला माहिती नाही. वगैरे बऱ्याच तक्रारी तिने मेसेजमध्ये लिहिल्या. नंतर तिच्याशी कोणी संपर्क केला नाही. किंवा करू शकले नाही. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्यावर नाराज असल्याचे समजते.
इकडे १० जनपथवर काँग्रेसला बळकट करण्याची वरिष्ठ नेत्यांची बैठक बराच वेळ सुरू राहिली. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी बाहेर आल्यानंतर पत्रकारांना बाईट दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App