विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारपासून हैदराबादपर्यंत आणि हैदराबादपासून राजस्थानपर्यंत जेवढ्या निवडणुका गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत पार पडल्या, त्यामध्ये भाजपचा प्रभाव मोडून काढण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला पण महाराष्ट्राचा अपवाद वगळता कोठेही त्या पक्षाला यश मिळाले नाही. Congress lost Rajasthan ZP panchayat elections
किंबहुना भाजपच्या संघटन यंत्रणेचा निवडणुकीतला प्रभाव एवढा चांगला होता की तिने प्रत्येक ठिकाणी त्यांना चढते यश मिळवून दिले. शेतकरी आंदोलन ऐन भरात असताना राजस्थानात तर भाजपने काँग्रेसवर ग्रामीण भागात मात करून दाखवली. शेतकरी आंदोलनात राजकीय शिरकाव करून देखील काँग्रेसला त्याचा फायदा उपटता आला नाही.Congress lost Rajasthan ZP panchayat elections
बिहारच्या विधानसभा निवडणुकीपासून शेतकरी आंदोलन पंजाब आणि हरयाणा मध्ये सुरू झाले होते. शेतकरी संघटित होत होते. पण त्यांनी दिल्ली धडक मारेपर्यंत बिहारची निवडणूक होऊन गेली होती. तेथे काँग्रेस प्रणित महागठबंधनने चांगली टक्कर देऊन देखील सत्तेचा घास त्यांना घेता आला नाही.
कृषिप्रधान बिहारमध्ये कृषी बिलांच्या विरोधातील प्रचार काँग्रेसला आणि महागठबंधनला सत्तेपर्यंत येऊ शकला नाही. त्याच वेळी झालेल्या 54 जागांच्या देशभरातील पोट निवडणुकांमध्ये कृषी बिलांचा मुद्दा प्रचारात होता. विरोधी प्रचारही खूप झाला. परंतु मतदारांवर तो प्रभाव पाडू शकला नाही. काँग्रेस प्रणित वेगवेगळ्या आघाड्यांची डाळ भाजपापेक्षा मतदारांनीच शिजू दिली नाही.
हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत कृषी बिलांचा विरोधातील प्रचाराचा फारसा प्रभाव पडणे शक्य नव्हते. तेथे देखील भाजपने संघटनेच्या आणि प्रभावी प्रकाराच्या जोरावर स्थान बळकट करून घेतले आणि काँग्रेस मात्र तेथे स्वतःची घसरण रोखू शकली नाही.
Bihar election results 2020 analysis live : काँग्रेसनेते आणि लिबरल विचारवंतांचा भाजप विस्ताराचा “वैचारिक बागुलबुवा”
राजस्थानमध्ये याच्या पूर्ण उलट परिस्थिती होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका थेट ग्रामीण भागात होत्या. शेतकरी आंदोलनाची धग पंजाब आणि हरियाणातून दिल्लीपर्यंत येऊन पोहोचली होती. राजस्थान, मध्य प्रदेश उत्तर प्रदेशचा हरितपट्टा येथून शेतकऱ्यांची कुमक दिल्लीपर्यंत पोहोचली होती. शेतकरी आंदोलन ऐन भरात होते. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी त्यात शिरकाव केला होता राजकीय परिस्थिती पूर्ण अनुकूल करून घेण्याचे राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारने प्रयत्न केले होते.
कृषी बिले विरोधातील वातावरण राजस्थानच्या ग्रामीण भागातही तापविण्याचा भरपूर प्रयत्न झाला. अशोक गेहलोत यांनी तर भाजप आपल्या सरकारसह सहा काँग्रेस सरकारे आणि विरोधी सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोपही करून घेतला. परंतु एवढी सगळी राजकीय मशक्कत करूनही राजस्थानात भाजपच्या संघटनेपुढे मतदारांनी काँग्रेसची डाळ शिजू दिली नाही. काँग्रेसने “बेस्ट बेट” लावलेल्या मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या राज्यात पक्ष भाजपकडून ग्रामीण भागात पराभूत झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App