कॉंग्रेस,डावे पक्ष शेतकऱ्यांच्या वेशभुषेत आंदोलनात, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा आरोप

कॉंग्रेस आणि डावे पक्ष शेतकऱ्यांच्या वेशभूषेत लपून कृषी कायद्यांविरोधात आंदोलनात बसले आहेत. या देशविरोधी शक्ती शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला आहे. Congress, Left Party in agitation


वृत्तसंस्था

सिहोर : कॉंग्रेस आणि डावे पक्ष शेतकऱ्यांच्या वेशभूषेत लपून कृषी कायद्यांविरोधात आंदोलनात बसले आहेत. या देशविरोधी शक्ती शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला आहे. Congress Left Party in agitation

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या की, शाहीनबागमध्ये जेएनयूतील काही  लोक, चित्रपट क्षेत्रातील काही डाव्या विचारांचे कलाकार सहभागी होते. तेच चेहरे आता पुढे येत आहेत. असे लोक देशाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना तुरुंगात टाकलेलंच योग्य होईल. Congress Left Party in agitation

पंजाबमधील कॉंग्रेस सरकारने हे नवीन कृषी कायदे लागू केलेला नाही. तरीही पंजाबमधील लोक इथं येऊन आंदोलन का करत आहेत? केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यात कुठल्याही सुधारणांची गरज नाही. सर्व सुधारणा करून हे कायदे आणले गेले आहेत.देशविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात लोकसंख्या नियंत्रण कायदा असायला हवा. पण जे राष्ट्रधमार्साठी कार्य करतात त्यांच्यावर या बंधन आणू नये, असे सांगून प्रज्ञासिंह म्हणाल्या जे देशाचा अपमान करतात आणि भगवाधारींना दहशतवादी ठरवतात ते क्षत्रिय नाहीत. हे लोक भगवा आणि हिंदुत्वाचा अपमान करतात, अशांना राजे म्हणू नये.

Congress Left Party in agitation

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा तीळपापड झाल्या आहेत असा आरोप करून प्रज्ञासिंह म्हणाल्या, हा भारत आहे, पाकिस्तान नाही, त्यांना समजलंय. हे बंगालमध्ये भाजप आणि हिंदूंचे राज्य येईल. बंगाल हा अखंड भारताचा एक भाग आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. बंगाल आपले हिंदू राज्य होईल. भारत एक हिंदू राष्ट्र होईल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*