विशेष प्रतिनिधी
भोपाळ: भारत आता महान राहिला नाही असे आपल्याच देशाची बदनामी करणारे वक्तव्य कॉंग्रेसचे जेष्ठ नेते कमलनाथ यांनी केले होते. आता यांच्याविरोधात क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५४ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटी माहिती पसरविल्याचा देखील त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. Congress leader Kamal Nath slapped for defaming India: ‘Indian Corona’ and now India is no longer great; Filed a crime
भाजपने गुन्हे अन्वेषण विभागाला कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिलं होतं. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कमलनाथ यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी कोरोनावरून भाजपवर टीका केली होती. आता कोरोनाला जगात ‘इंडियन कोरोना’ नावाने ओळखले जाईल, असं कमलनाथ यांनी म्हटलं होतं. तसेच सरकारने लाखो लोकांच्या मृत्यूची आकडेवारी लपवल्याचा दावाही कमलनाथ यांनी केला होता. त्यांचं हे विधान आक्षेपाहार्य असल्याचं भाजपने म्हटलं आहे. भाजपने रविवारी दुपारी हे निवेदन गुन्हे अन्वेषण विभागाला दिलं होतं. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने संध्याकाळी कमलनाथ यांच्याविरोधात दोन कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार ही दोन्ही कलमे जामीनपात्रं आहेत.
भारताविरोधी बधनामी करणारे वक्तव्य कमलनाथ यांना चांगलेच महागात पडले आहे. यांच्याविरोधात क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्याने त्यांना चांगलीच चपराक बसली आहे .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App