गोव्यात काँग्रेसच्या मदतीने राजकीय चंचुप्रवेश करण्याचा मनसूबा शिवसेनेने आखला होता. पण तो काँग्रेसने एका झटक्यात फेटाळून त्या पक्षाला त्याची “प्रादेशिक मर्यादा” दाखवून दिली.महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षा महाराष्ट्राबाहेर उफाळत चालल्या होत्या.Congress cut the kite of Shiv Sena-NCP’s Mahavikas Aghadi before entering Goa
आपण निवडणुका जिंकलो नाही तरी जुगाड करून वेगवेगळ्या राज्यांमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग राबवू शकतो, असा कथित आत्मविश्वास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वांना वाटत होता. यातून महाविकास आघाडीचा प्रयोग बाकी कोठे नाही तर निदान गोव्यात तरी करून पाहावा याची चाचपणी शिवसेनेच्या नेतृत्वाने संजय राऊत यांच्याकरवी करून घेतली. पण त्याहीपेक्षा संजय राऊत यांच्या पाठीशी चाचपणीसाठी बळ होते ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाचे.काँग्रेसने त्यांच्या नेहमीच्या शैली प्रमाणे शिवसेनेच्या नेतृत्वाशी म्हणजे संजय राऊत यांच्याशी चर्चा जरूर केली.
अगदी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देखील त्यांना भेटीची वेळ दिली. त्यातून संजय राऊत यांचा गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा “आत्मविश्वास” वाढला आणि त्यांनी पुढाकार घेऊन गोव्यातल्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. पण या चर्चेच्या पहिल्या फेरीतच गोव्यातल्या काँग्रेस नेतृत्वाने संजय राऊत यांना पटखनी दिली आणि शिवसेनेचा कथित महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला पहिल्याच फटक्यात गुंडाळून टाकला.
संजय राऊत निदान चर्चेसाठी गेले. काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा तरी केली पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी महाविकास आघाडीची चर्चा करायची धाडसही दाखवले नाही. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला काँग्रेसच्या नेतृत्वाचा जो अनुभव आहे त्या अनुभवातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने गोव्यात किंवा दिल्लीत काँग्रेसचे नेतृत्वाशी महाराष्ट्राबाहेरच्या आघाडीविषयी चर्चाच करायची नाही, असे ठरवून टाकलेले दिसते. कारण काँग्रेस नेते कायम शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या मर्यादा ओळखून त्यांना त्यांच्या “जागा दाखवून” देत असतात..!!
शिवसेनेच्या नेतृत्वाला पुढे घालून गोव्यात चाचपणी करू पाहणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला गोव्यासारख्या छोट्या राज्यात असलेल्या काँग्रेस नेत्यांनी पहिल्याच फटक्यात जमालगोटा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीचा फॉर्मुला महाराष्ट्राबाहेर नेण्याचे आणि काँग्रेसच्या बळावर इतर राज्यांमध्ये आपला चंचुप्रवेश करण्याचे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्न मात्र पुरते पहिल्याच फटक्यात गळले आहे. गोव्यात जी काय ताकद आहे ती काँग्रेसची स्वतंत्र ताकद आहे.
त्या ताकदीमध्ये देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी आपला वाटा जर मागत असतील तर कोण ऐकून घेईल?, गोव्यात राजकीय अस्तित्वात नसलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐकून घ्यायला काँग्रेसचे नेते काय दुधखुळे आहेत? त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाने शिवसेनेच्या नेतृत्वाशी चर्चा जरी केली असली तरी प्रत्यक्ष कृतीतून आपला राजकीय इंगा दाखवून दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App