
संवाद ही फार महत्वाची बाब आहे. संवादाच्या प्रक्रियेत ज्याप्रमाणे बोलणारा व्यक्ती महत्वाचा असतो त्याचप्रमाणे ऐकणाराही मोलाचा असतो. कुणीच आपले ऐकून घेतले नाही किंवा आपण कोणाशीच बोललो नाही तर मनाचा कोंडमारा असह्य़ होतो. संवाद नसतो तेथे आत्मकेंद्रीपणा येतो.Communication is very important, from listening; Blow up the dialogue
एकटेपणा वाटू लागतो. संवाद खुंटला की गैरसमज वाढतात, कटुता, फुटीरता वाढते. स्वार्थ डोकावतो. आपण आपल्यातच गुरफटून राहिलो तर त्याचा आपल्यालाच त्रास होतो. व्यक्त होणे ही माणसाची गरज आहे, म्हणून तर आपण समाजात राहतो.
आपल्या आजूबाजूला अनेक स्वभावाची, वेगवेगळी आवड-निवड असलेली माणसे असतात. त्यांना जाणून घेतले तर आपले व्यक्तिमत्त्व आपोआपच खुलत जाते. माणूस म्हणून आपण घडत जातो. मनात ताण असतील तर ते हलके होतात. भांडणातून प्रेम वाढते असे म्हटले जाते ते उगीच नाही.
शिवाय ऐकणे म्हणजे केवळ मानवी आवाज वा बोल ऐकणे एवढाच मर्यादित अर्थ नाही. पक्षांचा किलबिलाट, वाऱ्याची झुळूक, पाण्याचा खळखळाट ऐकता व अनुभवता आला पाहिजे. निसर्गाशी संवादही साधता आला पाहिजे. त्यात एक सौंदर्य आहे. निसर्गाची क्षीण होत जाणारी हाक आपण ऐकत नाही. त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. रानावनात भटकताना चहुकडे पसरलेली हिरवाई बघून मन कसे ताजेतवाने होते. याचा प्रत्यय आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. मात्र हा संवाद एकदा साधला आणि विसरुन गेले असे होता कामा नये. त्यात सातत्य असणे आवश्यक आहे.
सध्याच्या काळात संवाद खुंटल्याने समाजाला दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. लोकांबरोबर सुसंवाद निर्माण होईल तेव्हाच कठोर निर्णय घेणे शक्य होईल. संवादाची ही सुंदर कला कोणी शिकवल्याने येणार नाही. ती एक प्रक्रिया आहे. आधी ऐका मग ऐकवा. आधी घ्या नंतर द्या या पद्धतीने ती फुलत गेली पाहिजे. त्यातूनच आदरभावना वाढीस लागते.
Communication is very important, from listening; Blow up the dialogue