Chhattisgarh Congress : घोषणापत्रात शराबबंदी ! ‘थोड़ी-थोड़ी पीया करो’ महिला बालकल्याण मंत्री अनिला भेडिया यांचा महिलांना अजब सल्ला

  • छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात राज्यात संपूर्ण दारूबंदीचे आश्वासन दिले होते. Chhattisgarh Congress: Prohibition of alcohol in manifesto! ‘Drink a little’ Anila Bhedia’s strange advice to women

विशेष प्रतिनिधी

रायपूर : छत्तीसगढमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत यातच आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) राज्यात दारूबंदीचा आश्वासन देत आहेत, तर त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्री महिलांना दारु पिण्याचा सल्ला देत आहेत.Chhattisgarh Congress: Prohibition of alcohol in manifesto! ‘Drink a little’ Anila Bhedia’s strange advice to women

भूपेश सरकारमधील महिला आणि बालकल्याण मंत्री अनिला भेडिया (Anila Bhedia) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पुरुषांना एक छोटा पेग घालून झोपायला सांगत आहेत. जेणेकरून महिला तणावमुक्त राहतील.
त्या पुढे म्हणाल्या की, महिला दिवसभर घरकाम करुन थकतात, त्यामुळे स्त्रियांना त्रास न देता थोड्या प्रमाणात मद्य प्राशन करुन झोपावे.

मंत्र्याच्या या विचित्र सल्ल्यानंतर ती वादाच्या भोवऱ्यात आली आहे. त्यांच्या सल्ल्याचा हा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

बुधवारी बालोद जिल्ह्यातील सिंघोला गावात पोहोचलेल्या मंत्र्यांना दारूबंदीच्या संदर्भात महिलांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. गावातील अनेक महिलांनी सांगितले की, जेव्हापासून शासनाने गावकऱ्यांना स्वतःची दारू बनवण्यास परवानगी दिली आहे, तेव्हापासून गावात त्याचा वापर आणखी वाढला आहे. यावर मंत्र्यांनी गावकऱ्यांना हसत म्हणाल्या, तुम्ही मद्य प्या मात्र कमी प्या आणि घरात जावून शांत झोपा. मात्र घरातील महिलांना त्रास देऊ नका.

अनिला भेडिया यांनी नंतर दिले स्पष्टीकरण

वाद वाढल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे स्पष्टीकरण जारी केले. मंत्री अनिला भेडिया म्हणाले की, मी दारु पिणाऱ्या लोकांना संबोधित करताना म्हटले की, त्यांनी मद्य कमी प्यावे. घर आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांमुळे महिलांना खूप मानसिक दबावाला सामोरे जावे लागते.

त्या पुढे म्हणाल्या, दारुचे व्यसन वाईट असून प्रत्येकाने त्यापासून मुक्त व्हावे. त्याचवेळी मंत्री अनिला यांच्या वक्तव्यानंतर भाजपने प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, काँग्रेस राज्यात दारूबंदीबाबत बोलत असताना त्यांचे मंत्री लोकांना दारू पिण्यास सांगत आहेत. अशा वक्तव्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि दारुचा वापर आणखी वाढेल, असे भाजपने म्हटले आहे.

Chhattisgarh Congress: Prohibition of alcohol in manifesto! ‘Drink a little’ Anila Bhedia’s strange advice to women

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात