राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे (एनटीए) ३ ऑक्टोबरला होणाऱ्या जेईई अॅडव्हान्स या परीक्षेमुळे त्या दिवशीच्या राज्यातील सीईटीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ३ ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटीच्या परीक्षा आता ८ ऑक्टोबरला होणार आहेत. Changes in CET schedule due to JEE Advance Examination; The exam will be held on October 8 instead of October 3
विशेष प्रतिनिधी
पुणे: राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे (एनटीए) ३ ऑक्टोबरला होणाऱ्या जेईई अॅडव्हान्स या परीक्षेमुळे त्या दिवशीच्या राज्यातील सीईटीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ३ ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटीच्या परीक्षा आता ८ ऑक्टोबरला होणार आहेत.
राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) स्पष्ट केले आहे. प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकात ३ ऑक्टोबरला पाच अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सीईटी होणार होती. मात्र, त्याच दिवशी आयआयटी, एनआयटी प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील जेईई अॅडव्हान्स ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे सीईटीने त्या दिवशीच्या सीईटीच्या वेळपत्रकात बदल करून त्या परीक्षा ८ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.
हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, बीएड-एमएड, पाच वर्षांचा विधी अभ्यासक्रम, बीपीएड या अभ्यासक्रमाच्या सीईटी ८ ऑक्टोबरला होईल. तर बीपीएडची प्रात्यक्षिक परीक्षा ९ ते १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
व्यावसायिक शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सीईटी परीक्षा सीईटी सेलतर्फे घेण्यात येत आहेत. त्यानुसार राज्य सीईटी सेलने सर्व सीईटीचे वेळापत्रक सप्टेंबरला जाहीर केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App