पदवीधर- शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारला जनतेचा कल कोणाच्या बाजूने आहे, याची जाणीव नक्कीच होईल. ही निवडणूक महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
विशेष प्रतिनिधी
सांगली : पदवीधर- शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारला जनतेचा कल कोणाच्या बाजूने आहे, याची जाणीव नक्कीच होईल. ही निवडणूक महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तिघे एकत्र या नाही तर चौघे या आम्ही एकटे पुरेसे आहोत, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. chandrakant patil statement news
राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांसाठी विक्रमी मतदान झाले आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्रितरीत्या प्रथमच निवडणूक लढवत असल्याने, त्यांच्या दृष्टीने इतिहास घडवणारी, तर भाजपच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, ही निवडणूक महाराष्ट्रात परिवर्तनानची नांदी ठरेल. आजची निवडणूक ही महाविकास आघआडीला एक मोठा हादरा देईल. लोकाशाहीमध्ये जनतेकडे मतदान हेच एकमेव असे प्रभावी शस्त्र आहे, जे सरकारला त्यांच्या अपयशी कारभाराची जाणीव करून देतो. या निवडणुकीच्या माध्यमातून लोक आघाडी सरकारला किती कंटाळले आहेत हे समजेल. chandrakant patil statement news
भाजपा सरकारमध्ये नसूनही ज्या प्रकारचे समर्थन पदवीधर आणि शिक्षकांनी आमच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण राज्यात दिले, ते फारच उत्साहवर्धक होते. या निवडणुकीमुळे सरकारच्या बहुमताला काही फरक पडणार नाही, मात्र पुढे तरी सरकार जनहितार्थ कार्य करण्याचा विचार तरी करेल, अशी इच्छा व्यक्त करतो, असे पाटील म्हणाले.
त्यांनी सांगितले की, राज्यात पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणुकीसाठी रांगेत उभे राहून मतदान करण्यात येत असून अत्यंत चांगला उत्साह मतदारांमध्ये पाहायला मिळाला. म्हणून भाजप 6 च्या 6 जागा चांगल्या मताधिक्क्याने जिंकेल. विधान परिषदेत सध्या 66 पैकी सध्या 60 जागा आहेत. यात भाजपा आमदारांची संख्या 25 आहे. त्यात नव्याने निवडून येणाऱ्या सहाची भर पडली तर ते 31 होतील आणि विधान परिषदेत भाजपाचे बहुमत असेल. यावेळी इतर सगळ्यांच्याकडे मिळून 33 असतील असाही विश्वास चंद्रकांत पाटीलांनी व्यक्त केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App