वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी भारतातील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत भारतामधील परिस्थिती काळजी करण्यासारखी असल्याचा दावा केल्यावर ताबडतोब केंद्रातील मोदी सरकारने त्यावर आक्षेप नोंदविला आहे. कॅनडामधील लोकप्रतिनिधींना भारतातील शेतकऱ्यांच्या संदर्भात पुरेशी माहिती नाही. त्यामुळे सल्याचं यासंदर्भात भाष्य करण्याचा अधिकार कॅनडामधील नेत्यांना नाही असेही मोदी सरकारने स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. Canada PM Justin Trudeau
पंतप्रधान जस्टिन त्रूडो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र मानले जातात. तरीही त्यांनी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये काही कमेंट करताच मोदी सरकारने त्यावर ठाम शब्दांत आक्षेप नोंदविला आहे. कॅनडास्थित काही खलिस्तानवादी संघटनांनी शेतकरी आंदोलनाबाबत आक्रमक आणि आक्षेपार्ह भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने थेट कॅनडाच्या पंतप्रधानांनाच सुनावल्याने केंद्र सरकारची ठाम भूमिका अधोरेखित झाली आहे. Canada PM Justin Trudeau
मंगळवारी सलग सहाव्या दिवशी शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळल्याचे चित्र दिसत असताना केंद्र सराकारने शेतकऱ्यांशी सामंजस्याने सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची भूमिका घेतली. त्यानुसार मंत्रीगटाशी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चाही सुरू झाल्याचे समजते.
या पार्श्वभूमीवर भारताचे मित्र राष्ट्र असणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत कोणत्याही शांततापूर्ण आंदोलनाचा आमचा पाठिंबा असून भारतामधील परिस्थिती चिंताजनक वाटत असल्याचे म्हटल्याने भारताने वेळीच आक्षेप नोंदवून बाहेरच्या शक्तींना इशारा दिला आहे.
Canada PM @JustinTrudeau raises the issue of farmer protests in India. Says, "situation is concerning…. Canada will always be thr to defend the right of peaceful protest". Adds, "we have reached out through multiple means directly to Indian authorities" pic.twitter.com/SKa0GJAMzr— Sidhant Sibal (@sidhant) December 1, 2020
Canada PM @JustinTrudeau raises the issue of farmer protests in India. Says, "situation is concerning…. Canada will always be thr to defend the right of peaceful protest". Adds, "we have reached out through multiple means directly to Indian authorities" pic.twitter.com/SKa0GJAMzr
त्रूडोंची विधाने पुढील प्रमाणे –
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या मंत्रिमंडळामधील शीख नेत्यांशी संवाद साधताना जस्टिन त्रुडो यांनी गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पुढे बोलताना त्यांनी भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला. “भारतामधील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख न करणे चुकीचे ठरेल.
भारतामध्ये सध्या सुरु असलेल्या या आंदोलनाची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. शीख समुदायातील व्यक्तींच्या नातेवाईकांबद्दल कॅनडात राहणाऱ्या अनेकांना चिंता वाटत असेल तर ते सहाजिक आहे. अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याच्या हक्काचे आम्ही पाठीराखे आहोत.
संवादातून प्रश्न सुटू शकतो यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून या विषयाबद्दलची आमची चिंता आम्ही भारतीय अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी व्यक्त केली आहे. कोरोना आणि सर्व परिस्थिती लक्षात घेता आपल्याला एकत्र राहणे गरजेचे आहे,” असे त्रुडो यांनी विधान केले होते. भारताने हे विधान म्हणजे आपल्या अंतर्गत बाबींवर हस्तक्षेप असल्याचे मानले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App