BREAKING NEWS : UNLOCKED ? राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय ; औरंगाबाद सह १७ जिल्हे पूर्णपणे अनलॉक ?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील अनलॉक  विषयी माहिती दिली. महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. अनलॉक साठी कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत.BREAKING NEWS : UNLOCKED MAHARASHTRA

ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षेबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात इयत्ता १२ वीची परीक्षा रद्द करण्यासोबतच राज्यात आता एकूण पाच स्तरांवर अनलॉक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आला आहे.

जाणून घ्या कोणते आहे ते १८ जिल्हे -👇🏻

औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ याठिकाणी आता पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी उद्यापासूनच केली जाणार आहे.

राज्यातील अनलॉकची विभागणी पाच स्तरांवर करण्यात आली आहे. यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि एकूण ऑक्सिजन बेड्स २५ टक्के व्यापलेले असतील अशा ठिकाणी पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. यात सर्व दुकानं, गार्डन, सलून, थिएटर्स, मनोरंजनाची ठिकाणं सुरू ठेवता येणार आहेत. या पहिल्या स्तरामध्ये एकूण १८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

खालील सर्व बाबी उद्यापासून सुरु?

🔹रेस्टॉरंट, मॉल्स गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील
🔹 खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील
🔹 चित्रपट शुटींगला परवानगी. थिएटर सुरू होतील
🔹 सार्वजनिक कार्यक्रम , लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट दिली आहे
🔹 ई कॉमर्स सुरू राहिल. जिम, सलून सुरू राहणार
🔹 पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही
🔹 बस 100 टक्के क्षमतेने. आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल
🔹 इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील

अनलॉकचे एकूण पाच स्तर नेमके कोणते?

पहिला स्तर- पूर्णपणे अनलॉक
दुसरा स्तर- मर्यादित स्वरुपात अनलॉक
तिसरा स्तर- निर्बंधासह अनलॉक
चौथा स्तर- निर्बंध कायम
पाचव्या स्तर- रेड झोन, पूर्णपणे लॉकडाऊन

BREAKING NEWS : UNLOCKED MAHARASHTRA ?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात