वृत्तसंस्था
मुंबई:गुलाब चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओरीसा किनारपरट्टीला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याआधी आलेल्या तौक्ते वादळाचा फटका आपण पाहिलाच आहे. आता गुलाब या वादळाचा फटका महाराष्ट्राला कसा बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.Breaking News Cyclone Gulab Update: Caution! Impact of GULAB Cyclone on Maharashtra; Orange alert issued to several districts
गुलाब चक्रिवादळ बंगालच्या उपसागरात -IMDउ आंध्र प्रदेश व द ओरीसा किनारपट्टीला चक्रिवादळाचा इशारा26 Sept संध्याकाळी उ.आंध्र प्रदेश व द.ओरीसा किनारपट्टी,कलिंगपट्नम व गोपालपूर मध्ये धडकण्याची शक्यतामहाराष्ट्रसाठी IMD ने पुढच्या 3,4 दिवसासाठी काही ठिकाणी मुसळधार पावसाचे इशारे दिलेत pic.twitter.com/Qs3p7uOCVU — K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 25, 2021
गुलाब चक्रिवादळ बंगालच्या उपसागरात -IMDउ आंध्र प्रदेश व द ओरीसा किनारपट्टीला चक्रिवादळाचा इशारा26 Sept संध्याकाळी उ.आंध्र प्रदेश व द.ओरीसा किनारपट्टी,कलिंगपट्नम व गोपालपूर मध्ये धडकण्याची शक्यतामहाराष्ट्रसाठी IMD ने पुढच्या 3,4 दिवसासाठी काही ठिकाणी मुसळधार पावसाचे इशारे दिलेत pic.twitter.com/Qs3p7uOCVU
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 25, 2021
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुलाब हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झालं आहे. गुलाब चक्रीवादळ बंगालच्या उपसगारात दाखल झालं आहे. आंध्र प्रदेश, द ओरिसा किनारापट्टीला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला. 26 सप्टेंबर म्हणजेच रविवारी संध्याकाळी आंध्र प्रदेश, ओरीसा किनारपट्टी या ठिकाणी धडकू शकतं.
राज्यातील या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट-
27 सप्टेंबर : औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
28 सप्टेंबर : नंदुरबार, धुळे, जळगाव, रायगड आणि रत्नागिरी या जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
26 सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
27 सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल.
हवामान खात्यानं या वादळाला गुलाब असं नाव दिलं आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हे चक्रीवादळ सक्रीय राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाआहे.
आंध्रप्रदेशातील उत्तरेचा भाग आणि ओदिशातील दक्षिणेचा भाग यांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुढील काही तासात वादळाचा वेग वाढणार असल्याने हवामान खात्याने आंध्रप्रदेश आणि ओडिशात यलो अलर्ट जारी केला आहे. 26 सप्टेंबरपर्यंत कलिंगपट्टनम भागात यामुळे जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App