जिंकलास !! ‘शुर’ मयुर शेळके …’दानशूर’ मयुर शेळके

विशेष प्रतिनिधी

मुंबई : एक मुलगा आपल्या आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत होता. पण चालत असताना त्या लहानग्याचा तोल गेला आणि तो मुलगा ट्रॅकवर पडला. त्या मुलाची अंध आई चाचपडत होती. त्याच वेळेला एक मेल-एक्सप्रेस त्या मुलाच्या दिशेने आली त्यावेळी जीवाची पर्वा न करता मयुर शेळके याने रुळावर पडलेल्या साहिल शिरसाट या चिमुकल्याचा जीव वाचवला होता.Braveheart Mayur Shelke Donates Reward To Visually Impaired Mother And Her Child Who He Heroically Saved

या घटनेनंतर काही तासातच या घटनेचा व्हिडियो सोशलवर तुफान व्हायरल झाला. वांगणी रेल्वे स्थानकात झालेल्या या घटनेच्या व्हिडियोची दखल रेल्वे मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वानी घेत मयूर शेळकेचे कौतुक केले तसेच त्याला रेल्वेकडून त्याला पन्नास हजार रुपयांचं विशेष बक्षीस जाहीर करण्यात आलं.

लवकरच ही रक्कम त्याला मिळणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्याने बक्षिसाची अर्धी रक्कम अंध मातेला देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. याशिवाय जावा कंपनीनेही मयुर शेळकेला बाईक भेट देण्याची घोषणा केली आहे. बक्षिसाची अर्धी रक्कम अंध मातेला देण्याचा स्तुत्य निर्णय घेतल्यामुळे पुन्हा एकदा मयूर शेळकेच्या या निर्णयाचे सोशलवर कौतुक होत आहे. शौर्य गाजवून मनं जिंकणारा मयुर आपल्या ठायी असलेल्या दातृत्व गुणाचंही दर्शन घडवत आहे.

मयूर शेळके यांचा रेल्वे विभागाकडून सन्मान करण्यात आला आहे. तसेच, 50 हजार रुपयांचे बक्षीसही त्यांना रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मयूरच्या धाडसाचे कौतुक करत, आपण केलेलं काम अतुलनीय असल्याचं म्हटलंय. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन मयूर शेळकेंचं कौतुक केलंय. तर, जावा मोटारसायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवी कोरी जावा मोटारबाईक गिफ्ट देणार असल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलंय.

महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्र यांनीही मयूर शेळकेंच कौतुक केलंय. मयूर यांच्याजवळ खास ड्रेसकोट किंवा टोपी नाही, तरीही मयूर यांनी सुपरहिरोच्या तुलनेत अधिक धाडसी काम केलंय, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटलंय.

Braveheart Mayur Shelke Donates Reward To Visually Impaired Mother And Her Child Who He Heroically  Saved

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात