BMC SAYS NO BANNER : लसीकरणाच्या कार्यक्रमात बॅनरबाजी ; BMC च्या सूचनांचे आदित्य ठाकरेंकडूनच उल्लंघन ;लसीकरण केंद्रावर कारवाई होणार का?

  • मुंबई महापालिकेचा आदेश आदित्य ठाकरेंना महत्त्वाचा वाटत नाही का?

  • एकीकडे बीएमसी बॅनरबाजी करु नका असे सांगत असताना महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हेच या नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले.

विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुंबईत लसीकरणाबाबत एक महत्त्वाचा आदेश  बीएमसी अर्थात मुंबई महापालिकेने काढला आहे . बीएमसीने एक परिपत्रक काढून लसीकरण करताना कोणत्याही प्रकारचे बॅनर, पोस्टर, होर्डिंग तसेच भित्तीपत्र लावू नय़े तसेच राजकीय फायद्यासाठी जाहिरात करु नये अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र आता मुंबई महापालिकेच्या सूचनांचे खुद्द आदित्य ठाकरे यांनीच उल्लघंन केल्याचे समोर आले आहे.BMC SAYS NO BANNER: Banner in vaccination program; Aditya Thackeray violates BMC instructions; will action be taken against vaccination center?

शिवसेनेच्या युवासेनेतर्फे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात 18+ वयोगटातील युवकांना विनामूल्य कोविड लसीकरण आयोजित करण्यात आले होते. या लसीकरणाचे आयोजक आदित्य ठाकरेंचे सख्खे मावसभाऊ वरुण सरदेसाई होते. या लसीकरणासाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती.

एकीकडे बीएमसी बॅनरबाजी करु नका असे सांगत असताना महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हेच या नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले.

बीएमसीने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकानुसार नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित लसीकरण केंद्राची मान्यता रद्द कऱण्यात येणार असल्याचे सांगितले होते तेव्हा आता आदित्य ठाकरेंचे मावसबंधू असलेल्या वरुण सरदेसाई यांनी आयोजित केलेल्या लसीकरण केंद्रावर कारवाई होणार का हे बघणे औत्सुकाचे ठरणार आहे.

काय सांगतो बीएमसीचा नियम ?

लसीकरण केंद्रबाहेर राजकीय बॅनरबाजी नको!

मुंबईत लसीकरण केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनर आणि पोस्टर लावल्याचे आढळून आल्याने महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यासंबंधी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की, राजकीय फायद्यासाठी अनुचित जाहिराती करणे योग्य नाही.

यामुळे मुंबईतील कोणत्याही लसीकरण केंद्राबाहेर आता राजकीय पक्षांना आपले बॅनर किंवा पोस्टर लावता येणार नाही.

दरम्यान, याच परिपत्रकात खासगी लसीकरण केंद्राबाबत देखील मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिलेलं आहे. ‘खाजगी लसीकरण केंद्र यांनी औद्योगिक संस्था गृहसंकुल येथे लसीकरण सुरु करण्यापूर्वी सदर संस्थेशी सामंजस्य करार करणे अनिवार्य असून करारात खासगी लसीकरण केंद्रामार्फत उपलब्ध असलेल्या वैद्यकीय कर्मचारी, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेची उपलब्धता इ. संदर्भात स्पष्टपणे उल्लेख असणे आवश्यक आहे. मुंबई बाहेरील कोणत्याही खासगी लसीकरण केंद्राला मुंबईत येऊन लसीकरण करण्याची परवानगी मिळणार नाही.’ असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

BMC SAYS NO BANNER: Banner flying in vaccination program; Aditya Thackeray violates BMC instructions; will action be taken against vaccination center?