विज्ञानाची गुपिते : रोगप्रतिकार शक्ती देणाऱ्या रक्तपेशी

सध्या जगभर कोरोनाने हाहाकार माजविला असून या काळात शरीराच्या प्रतिकारशक्तीला कमालीचे महत्व आले आहे. कारण कोरोनावर सध्या तरी कोणतेच औषध उपलब्ध नाही. त्यामुळे ज्याची प्रतिकारशक्ती उत्तम आहे त्याला कोरोनापासून स्वतःचा बचाव करणे शक्य आहे. शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास तसेच टिकवण्यात रक्तातील पेशींचा फार मोठा वाटा असतो. माणसाच्या शरीरात साधारणपणे पाच ते सहा लिटर रक्त असते. त्या रक्तातून आपल्या शरीराला प्राणवायूचा व योग्य खाद्यपदार्थांचा पुरवठा होतो.Blood cells that provide immunity

त्याचप्रमाणे अवयवातील कर्ब व अन्य अनावश्यक घटक शरीराच्या बाहेर फेकण्यात येतात. आपल्या रक्तामध्ये लाल व पांढऱे प्लाझमा असतात. त्यांना रक्तद्रव असेही म्हणतात. लाल रक्तकणाला इरीथ्रोसाईट म्हणतात. या पेशी असून या मध्ये न्यूक्लीअस नसतो. शरीरात ४० ते ५० टक्के रक्त लाल रक्तकणांचे असतात. या लाल रक्पेशी हिमोग्लोबीन या द्रव्याद्वारे शरीराला प्राणवायूचा पुरवठा करतात. हाडाच्या आतील बोनमॅरोतील स्टेम सेल्सपासून हे लाल रक्तकण सातत्याने तयार होत असतात. लाल रक्तकण १२० दिवसांपर्यंत म्हणजे चार महिने जिवीत राहतात.

त्यानंतर मृत झाल्यावर ते प्लिहेत जमा होतात. प्लीहेत रक्तातील सर्व घटक सुटे पडतात ते पुन्हा शरीरात वापरले जातात. पांढऱ्या रक्कपेशी ज्या ल्युकोसाईट असे म्हटले जाते. त्यांचे शरीरातील प्रमाण केवळ एक टक्का असते. या शुभ्र रक्तपेशी आपल्याला रोगप्रतिकार शक्ती देतात. ग्रॅनुलोसाईटस् व मायक्रोफेजेस नावाच्या शुभ्र रक्पेशी शरीरात शिरणाऱ्या जीवाणू, विषाणू व अन्य पॅरासाईटस्चा फडशा पाडतात व त्यांच्यापासून शरीराचे रक्षण करतात. पांढऱ्या रक्तपेशी १८ ते २६ तास जीवित राहतात. त्यांची जागा नंतर दुसऱ्या पेशी घेतात.

रक्तात असलेल्या थ्रोंबोसाईटस् जखम झाल्यावर रक्त गोठण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावतात. रक्तातील आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे प्लाझ्मा. रक्तात ५५ टक्के प्लाझ्मा असतात. त्यात ९५ टक्के पाणी असते. शरीराच्या कानोकोपऱ्यात अन्नद्रव्य पोहोचविणे व नको असलेले द्रव्य मूत्रपिंडातून बाहेर फेकणे या कार्यात प्लाझ्मा महत्वाची भूमीका बजावतात.

Blood cells that provide immunity

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात