वृत्तसंस्था
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात काळ्या बुरशीचा संसर्ग (म्युकरमायकोसिस ) झालेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या आठवड्यात तब्बल १७६ रुग्णांची वाढ झाली आहे. एकूण ९६८ रुग्णांवर उपचार सुरू असून ९० जणांचा मृत्यू झाला. Black fungus infection in Pune, an increase of 176 patients; 90 patients died, 968 patients under treatment
‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांवर सरकारी आणि खासगी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एप्रिलमध्ये ३५५, मे मध्ये ४२१ आणि जून महिन्यात आतापर्यंत १९२ रुग्ण आढळले आहेत. मे मध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले होते.
पुणे शहरात २६ मे रोजी ‘म्युकरमायकोसिस’ चे २९० रुग्ण होते. त्यात दोन ते नऊ जून दरम्यान ७१ रुग्णांची वाढ झाली. पुण्यात ४०६ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यापैकी ९७ जण बरे झाले असून, २८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत; तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला.
पुणे जिल्ह्यात दोन ते नऊ जून या दरम्यान १७६ रुग्णांची नोंद झाली. त्यात पिंपरीमधील ३१, ससून रुग्णालयात ६० आणि पुणे ग्रामीण भागांत १४ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात २४२ जण आजारातून मुक्त
पिंपरी-चिंचवडमध्ये २२७ रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ११० जणांवर उपचार सुरू आहेत. ९३ रुग्ण बरे झाले असून, २४ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागांत ४५ रुग्ण आढळले. असून, त्यापैकी १५ बरे झाले आहेत. सध्या २१ रुग्णांवर उपचार सुरू असून नऊ जणांचा मृत्यू झाला.
ससून रुग्णालयात २९० रुग्ण आढळले असून, त्यापैकी २२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ३७ रुग्ण बरे झाले आहेत. २८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९६८ रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ झाला असून, २४२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ६३६ रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App