विशेष प्रतिनिधी
नागपूर : भाजपची विजयाची शृंखला सुरु झाल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपचे सहा पैकी ४ उमेदवार विजयी झाले आहेत.BJP’s winning streak begins; 4 BJP candidates win in Legislative Council elections
नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला. काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशममुख यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे सहा जागांपैकी बावनकुळे यांच्यासह चार भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे. या विजयाबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर आनंद व्यक्त केला आहे. तसेच महाविकासबआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. “तीन पक्ष एकत्र आल्यानंतर सर्व विजय शक्य असतात हे गणित चुकल्याचे या विजयानं स्पष्ट केलं आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.
ते म्हणाले, “आज मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा विजय मिळाला आहे. खरंतर मी स्वत: निवडून आलो, तेव्हा झालेल्या आनंदापेक्षाही जास्त आनंद आज मला झाला आहे. या विजयाने महाविकास आघाडीला जोरदार चपराक बसली आहे.
दरम्यान, अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय मिळवला आहे. विधानपरिषदेच्या सहा पैकी चार जागी भाजप निवडून आला आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळ्या प्रकारचे विजय होऊ शकतात, असे मांडले जाणारे गणित चुकीचे आहे, असे या विजयानंतर स्पष्ट होत आहे. राज्यातली जनता भाजपच्या पाठिशी आहे. बावनकुळेंचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे”, असं फडणवीस म्हणाले.
– भाजपची विजयाची शृंखला सुरु – देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आनंद व्यक्त – विधानपरिषदेमध्ये भाजपचे ४ उमेदवार विजयी – सहा पैकी चार जागी भाजप निवडून आला – राज्यातली जनता भाजपच्या पाठिशी – महाविकास आघाडी एकत्र लढूनही पराभूत – नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे विजयी – अकोल्यात वसंत खंडेलवाल विजयी – राजहंस सिंग आणि अमरीश पटेल बिनविरोध
BJP’s winning streak begins; 4 BJP candidates win in Legislative Council elections
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App