२४३ जागांच्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भाजपने एकहाती कमळ चिन्हावर ७० जागा जिंकून डीडीसी मध्ये सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून येण्याचा मान मिळविला आहे.
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू – काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेत डॉ. फारूख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्तींच्या गुपकार गटाने आपण विजयी झाल्याचा कितीही दावा केला असला तरी जागांच्या आकडेवारीत भाजपच त्यांना भारी पडल्याचे दिसते आहे. मतमोजणी अद्याप सुरू आहे. काल रात्री १२.०० सुमारास एएनआय वृत्तसंस्थेने २४३ जागांच्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भाजपने एकहाती कमळ चिन्हावर ७० जागा जिंकून डीडीसी मध्ये सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून येण्याचा मान मिळविला आहे. त्या पाठोपाठ डॉ. अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सला ५६ तर मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपीला फक्त २६ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस २१ जागांसह पक्ष म्हणून चौथ्या स्थानावर दिसत असली तरी ४३ जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. उरलेल्या जागा छोट्या पक्षांमध्ये विखुरल्या गेल्या आहेत. BJP winning 70 seats in Kashmir
काल दिवसभर राष्ट्रीय वाहिन्या नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीचा सहभाग असणाऱ्या गुपकार गटाचा मोठा विजय झाल्याच्या बातम्या चालवत होत्या. पंरंतु, रात्री उशिरा भाजप सर्वांत मोठा पक्ष असल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने जाहीर केली. भाजपला यात सर्वाधिक म्हणजे ४ लाख ४२ हजार ९९४ मते मिळाली आहेत, तर नॅशनल कॉन्फरन्सला २ लाख ११ हजार १५३ मते मिळाली आहेत. पीडीपीला अवघी ४५ हजार २१० मते मिळाली आहेत. काँग्रेसला जागा फक्त २१ मिळाल्या असल्या तरी मते ९९ हजार ९३८ मिळाली आहेत. कारण त्यांनी सर्वत्र स्वतंत्र उमेदवार उभे केले होते.
गुपकार गटाचा भाग असणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला ५ जागा आणि ६,४०७ मते मिळाली आहेत, बहुजन समाज पक्षाला अवघी १ जागा आणि ७,३९७ मते मिळाली आहेत.
अपक्षांच्या ४३ जागा निवडून आल्यात त्यांना एकूण १ लाख १९ हजार ५५८ मते मिळाली आहेत. भाजपने काश्मीर खोऱ्यात ६० अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला होता. त्यापैकी २४ उमेदवार विजयी झाल्याचे सांगण्यात येते. परंतु, भाजपने अद्याप हा आकडा अधिकृतरित्या सांगितलेला नाही. त्यामुळे गुपकार गट विजयाचा दावा करीत असला तरी आकडेवारीच्या खेळात अपक्षांच्या मदतीने भाजप त्यांच्यावर मात करू शकतो, अशी चिन्हे आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App