२०१६ मध्ये भाजपा युतीला मिळाल्या होत्या ६ जागा
वृत्तसंस्था
हैदराबाद : हैदराबादची महापालिका निवडणूक ही भाजपाने राष्ट्रीय निवडणूक बनवलेली होती. तेजस्वी सूर्या, स्मृती इराणी या आक्रमक नेत्यांचा तसेच प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस यांनीदेखील हैदराबादचा दौरा केला होता. त्यानंतर योगी आदित्यनाथ, जे. पी. नड्डांचा, अमित शाह यांनीदेखील हैदराबादमध्ये प्रचार केला होता. Bjp win news
भाजपाने एकापाठोपाठ एक नेत्यांची रांग पालिका प्रचारासाठी उभी करत ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनवली होती. या निवडणुकांच्या निकालाचे कल हाती येत असून प्रथमदर्शनी भाजपाने ओवेसींच्या गडाला सुरूंग लावत मुसंडी मारल्याचे दिसत आहे. Bjp win news
सध्या हैदराबाद महानगरपालिकेच्या १३० जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. यामध्ये भाजपा सध्या ८५ जागांवर आघाडीवर आहेत. तस सत्तेत असलेली टीआरएस २९ जागांवर आणि ओवेसी यांचा एमआयम १७ जागांवर आघाडीवर असून तिसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपानं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तसंच अनेक दिग्गजांनी या ठिकाणी दौराही केला होता.
यापूर्वी २०१६ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपा युतीला केवळ ५ जागांवर विजय मिळाला होता. यापूर्वी सर्वच पक्षांनी या निवडणुकीत स्वत:ला झोकून दिल्याचं दिसलं होतं. दरम्यान, हाती आलेल्या कलांनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत हैदराबादमध्ये आपला विजय आहे, पुढची वेळ मुंबई महानगपालिकेची आहे, असे म्हटले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App