“आतंकवादी दाऊदने हडप केलेली जमीन मंत्री नवाब मलिक यांना विकण्याचा बनाव करण्यात आला. त्या जमिनीच्या माध्यमातून मिळणारे पैसे हे दाऊदच्या ‘टेरर फंड’ ऍक्टिव्हिटीसाठी वापरले जात होते. मोठ्या साहेबांना नवाब मलिकांच्या पराक्रमाची माहिती नव्हती?”
विशेष प्रतिनिधी
मुंबई: नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून, अटकेपासूनच भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच मागणीसाठी भाजपच्यावतीने आज मोर्चा काढण्यात आला. आजाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा मोर्चा काढण्यात येणार असून, मेट्रो सिनेमा, फेशन स्ट्रीट, आजाद मैदान या परिसरात भाजपकडून जोरदार बॅनरबाजीही करण्यात आली आहे.BJP Morcha: Fadnavis aggressive in assembly yesterday- BJP on the road today! BJP’s morcha for Malik’s resignation
नवाब मलिक यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दाऊद ईब्राहीमचा फ्रंटमॅन आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत मलिकांनी व्यवहार केल्याचा घणाघाती आरोप केला आहे. दहशतवाद्यांशी व्यवहार केल्याने काल फडणवीसांनी विधानसभेत मालिकांच्या राजीनाम्याची मागणी केली होती . त्यानंतर आज भाजपने मोर्चा काढला.
आतंकवादी दाऊदने हडप केलेली जमीन मंत्री @nawabmalikncp यांना विकण्याचा बनाव करण्यात आला. त्या जमिनीच्या माध्यमातून मिळणारे आर्थिक इनकम हे दाऊदच्या 'टेरर फंड' ऍक्टिव्हिटीसाठी वापरले जात होते. मोठ्या साहेबांना नवाब मलीकच्या पराक्रमाची माहिती नव्हती ?#NawabHataoDeshBachao — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 9, 2022
आतंकवादी दाऊदने हडप केलेली जमीन मंत्री @nawabmalikncp यांना विकण्याचा बनाव करण्यात आला.
त्या जमिनीच्या माध्यमातून मिळणारे आर्थिक इनकम हे दाऊदच्या 'टेरर फंड' ऍक्टिव्हिटीसाठी वापरले जात होते.
मोठ्या साहेबांना नवाब मलीकच्या पराक्रमाची माहिती नव्हती ?#NawabHataoDeshBachao
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 9, 2022
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ट्विटर हॅण्डलवर काही ट्विटस् करण्यात आली आहेत. भाजपने शरद पवारांवरही निशाणा साधला आहे.
सरकार निर्लज्जपणे सांगतंय की आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही. सरकारची मस्ती चालणार नाही. राजीनामा घेण्यासाठी इथे लाखोंचा जनसागर लोटला आहे असं दरेकर मोर्चा दरम्यान म्हणाले .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App