विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्यातलं महाविकास आघाडी सरकार आणि भाजप पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. हिंदू सणांवर निर्बंध घालण्यावरुन सामान्य नागरिक देखील भडकलेले आहेत .आता राज्य सरकारचा एकही हिंदूविरोधी आदेश आम्ही ऐकणार नाही आणि जन्माष्टमी जोरात साजरी करणार अशी भूमिका भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी घेतली आहे.यापूर्वी मनसेने देखील हीच भूमिका घेतली असल्याने आता महाविकास आघाडी सरकार विरूद्ध मनसे-भाजप असा सामना रंगणार .BJP-MNS VS MAHAVIKAS AAGHADI: No anti-Hindu decision of the government will be heard – Janmashtami celebrations with corona rules; Ram Kadam’s attack
दुसरीकडे मंत्री नवाब मलिक यांनीही राम कदमांच्या भूमिकेवर टीका केली आहे.
जन्माष्टमीच्या सणासाठी राज्य सरकारने अद्याप मार्गदर्शक तत्व आणि नियम जाहीर केलेले नाहीयेत. पण त्याआधीच भाजपने हा सण जोरात साजरा करणार असल्याचं जाहीर केलंय. राज्य सरकार हे हिंदूविरोधी असून आम्ही त्यांचा एकही निर्णय ऐकणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे.
“राज्य सरकारने दारुच्या दुकानांना परवानगी दिली आहे. बिअर बारही आता नेहमीप्रमाणे सुरु झाले आहेत, पण सरकार मंदीर खुली करायला परवानगी देत नाही.
ते आमच्या मार्गात अडथळा आणत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून देशातली जनता या सरकारचा देशविरोधी कारभार पाहत आहे. सरकारमध्ये घरी बसणारी लोकं आता असा आदेश देत आहेत की जन्माष्टमीचा उत्सव साजरा करु नका.
आम्ही सरकारचा एकही हिंदूविरोध निर्णय ऐकणार नाही, जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जाईल”, अशी भूमिका राम कदम यांनी घेतली आहे. हा उत्सव साजरा होत असताना कोविडच्या सर्व नियमांचं पालन होईल याची काळजी घेतली जाईल असंही राम कदम म्हणाले.
राम कदमांनी घेतलेल्या भूमिकेवर मंत्री नवाब मलिक यांनीही जोरदार टीका केली आहे. “भाजप आणि मनसेची लोकं म्हणत आहेत की ते जन्माष्टमीचा उत्सव साजरा करणार आहेत. यासंदर्भातले नियम आणि मार्गदर्शक तत्व नक्कीच जाहीर केली जातील. या नियमांचं पालन करणं ही सर्व नागरिक आणि राजकीय नेत्यांची जबाबदारी आहे.” राज्यातला विरोधी पक्ष आपल्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेला सल्ला ऐकत नसल्याबद्दल मलिकांनी आश्चर्य व्यक्त केलं. सरकारी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असाही इशारा यावेळी मलिकांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App