शेतकऱ्यांमध्ये खोट्या गोष्टी पसरवून भडकाविणाऱ्या विरोधी पक्षांचा डाव हाणून पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे. यात जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून भाजपाचे नेते ७०० पत्रकार परिषदा घेणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांबरोबर थेट संवाद साधण्यासाठी शेकडो चौपाल बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शेतकऱ्यांमध्ये खोट्या गोष्टी पसरवून भडकाविणाऱ्या विरोधी पक्षांचा डाव हाणून पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामध्ये जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून भाजपाचे नेते ७०० पत्रकार परिषदा घेणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांबरोबर थेट संवाद साधण्यासाठी शेकडो चौपाल बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.
BJP megaplan, activists will explain the benefits of agriculture law to farmers
नवा कृषि कायदा लागू झाल्यामुळे शेतकरी दलालांच्या बंधनातून मुक्त झाला आहे. मात्र, विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना भडकाविण्याचा प्रयत्न चालविला आहे. शेतकऱ्यांमध्ये खोट्या गोष्टी पसरविल्या जात आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपाने योजना आखली आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यांना नवीन कृषि कायद्याचे फायदे समजावून देणार आहेत. यासाठी चौपाल बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पत्रकार परिषद घेणार आहेत.
कृषि कायदाविरोधी आंदोलकांच्या डोळ्यात धुळ्याच्या शेतकऱ्यांचे अंजन, नव्या कायद्याने मिळवून दाखविला न्याय
भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस बीएल संतोष यांनी याबाबत सर्व राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. शेतकऱ्यांना विनाकारण भडकाविले जात आहे. त्यातून आंदोलन उभे राहिले आहे. शेतकऱ्यांना नव्या कृषि कायद्याचे फायदे समजावून सांगावेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठीच हे कायदे आणले असल्याचे त्यांना पटवून द्यावे, असे सांगण्यात आले आहे. या अभियानातून शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App