पश्चिम बंगालच्या विजयासाठी भाजपचा ‘फॉर्म्युला 23’


  • निरिक्षकांची नियुक्ती; 200 जागा जिंकण्याचे ध्येय

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली (पीटीआय) : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पाच विभागांसाठी 7 केंद्रीय निरिक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरीक्षक ग्राउंड लेव्हलची योग्य माहिती कळवून विजयश्री खेचून आणतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. bjp formula for west bengal 200 observers appointed

विधानसभेत 200 जागा निवडून आणण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. विजयासाठी आखलेल्या रणनिनुसार कार्यकर्त्यानी कामाला लागावे,असे आदेश दिले आहेत. त्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी फॉर्म्युला 23 ही गुप्त योजना बनविली आहे. त्यानुसार पावले टाकली जाणार आहेत. bjp formula for west bengal, 200 observers appointed

नड्डा यांनी केंद्रीय निरीक्षकाची संख्या पाच वरून आता सात अशी वाढविली असून त्यामध्ये केंद्रीय मंत्री, नेतेमंडळीचा समावेश आहे. 42 लोकसभा मतदारसंघातील 6 ते 7 विधानसभा मतदारसंघाचे त्यांना काम करावे लागेल.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ नरोत्तम हेदेखील केंद्रीय निरीक्षक होणार आहेत. शेखावत यांचे लक्ष कोलकतामधील लोकसभेच्या जागांवर आणि मुंडा यांचे लक्ष पूर्व मिदनापूर झारग्राम परिसरात असेल.

bjp formula for west bengal, 200 observers appointed

मांडवीयांनी हल्दियाच्या आसपास प्रतिक्रिया व्यक्त करणे अपेक्षित आहे, तर हावडा भागातील केशव मौर्य आणि प्रल्हाद पटेल यांना उत्तर बंगालमधील लोकसभेच्या जागांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जाऊ शकते. बल्यान यांचे लक्ष मुर्शिदाबाद आणि नादियाच्या आसपासच्या जागांवर ठेवतील. सर्व नेते या महिन्याच्या अखेरीस परिस्थितीबद्दल नड्डा यांना सविस्तर अहवाल देतील.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात