पश्चिम बंगालमध्ये प्रचारदौºयावर असताना भाजपाचे राष्टीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि राष्ट्रीय सरचिटणिस कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बंगालमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर हल्ला झाला ही खूपच निंदनीय घटना आहे. या घटनेचा कितीही निषेध करावा तरी कमीच आहे. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या राजकीय पुरस्कृत हिंसेच्या घटनेबाबत बंगालच्या सरकारला आता शांतताप्रिय जनतेला उत्तर द्यावंच लागेल, असा इशारा केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिला आहे. JP Nadda Attacke amit shah latest news
पश्चिम बंगालमध्ये प्रचारदौºयावर असताना भाजपाचे राष्टीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि राष्ट्रीय सरचिटणिस कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. ताफ्यातील त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर आणि कारवर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंबंधी अहवाल मागवला आहे. अमित शाह यांनी ममता बॅनर्जी सरकारला इशाराही दिला आहे.
याबाबत नड्डा म्हणाले, हल्यात मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाले आहेत. लोकशाहीसाठी ही लज्जास्पद घटना आहे. ताफ्यात हल्ला झाला नाही अशी कोणतीही कार नाही. मी बुलेटप्रूफ कारमध्ये होतो म्हणून सुरक्षित आहेत. पश्चिम बंगालमधील अराजकता आणि असहिष्णुता संपवावी लागेल. मी आज केवळ दुगार्देवीच्या आशीवार्दानेमुळेच बैठकीत पोहोचू शकलो.
महाराष्टाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ममतादीदी हीच लोकशाही आहे का? असा सवाल करत हल्याचा निषेध करत म्हटले आहे की, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा व कैलाश विजयवर्गीय यांच्या वाहन ताफ्यावर झालेला हल्ला हा टीएमसीच्या गुंडांनी केलेले अतिशय निंदनीय व लज्जास्पद आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो व दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतो, भाजपाचे महाराष्टाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाच्या जनतेने पंतप्रधान मोदी यांना दिलेले समर्थन पाहून विरोधकांचा गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. भाजप अशा भ्याड हल्ल्यांना कधीही घाबरला नाही आणि घाबरणारसुद्धा नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App