विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: कर्जबुडवे उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी यांना मोठा दणका बसला आहे. या तिघांची 9371कोटी रुपयांची संपत्ती बँकांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आहे. सक्तवसुली संचलनालयाने या तिघांची तब्बल 18 हजार कोटींची मालमत्ता जप्त केली होती. ही रक्कम बँकाच्या बुडित कर्जाच्या 80 टक्के इतकी आहे. BIG NEWS: Vijay Mallya-Nirav Modi and Mehul Choksi hit; Assets worth Rs 9371 crore in the possession of banks
विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांनाही परदेशातून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या तिघांनीही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कर्ज म्हणून घेतलेले पैसे आपल्या बेनामी कंपन्यांमध्ये वळवून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला होता. या तिघांनी मिळून बँकांचे 22,585.83 कोटी रुपये बुडवले होते.
मात्र, ‘ईडी’कडून या तिघांच्याही देश-विदेशातील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या एकूण मालमत्तेपैकी 969 कोटींची मालमत्ता ही परदेशात आहे. आतापर्यंत सरकारी बँकांना 8441 कोटी रुपये परत मिळाले आहेत. सध्या विजय माल्ल्या न्यायालयीन लढाईत पूर्णपणे गुंतला आहे. तर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या प्रत्यापर्णाच्या हालचालींना वेग आला आहे.
ED not only attached/ seized assets worth of Rs. 18,170.02 crore (80.45% of total loss to banks) in case of Vijay Mallya, Nirav Modi and Mehul Choksi under the PMLA but also transferred a part of attached/ seized assets of Rs. 9371.17 Crore to the PSBs andCentral Government. — ED (@dir_ed) June 23, 2021
ED not only attached/ seized assets worth of Rs. 18,170.02 crore (80.45% of total loss to banks) in case of Vijay Mallya, Nirav Modi and Mehul Choksi under the PMLA but also transferred a part of attached/ seized assets of Rs. 9371.17 Crore to the PSBs andCentral Government.
— ED (@dir_ed) June 23, 2021
माल्ल्या कंगाल – वकिलाला द्यायलाही पैसे नाहीत?
विजय माल्ल्या पूर्णपणे कंगाल झाल्याची माहिती आहे. कोर्ट कचेऱ्यांचा फेरा मागे लागल्याने आर्थिक नाकेबंदी झाल्याने मल्ल्याकडे वकिलांना देण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे वेळेत फी नाही दिली तर खटला लढणार नसल्याचा इशारा त्याच्या वकिलाने दिला आहे. त्यामुळे माल्ल्याची डोकेदुखी वाढली आहे.
भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून लंडनला फरार झालेल्या माल्याला आर्थिक घरघर लागली आहे. त्याच्या वैयक्तिक खर्चांनाही चाप लागला असून वकिलांना देण्यासाठीही त्याच्याकडे पैसे उरले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App