विशेष प्रतिनिधी
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते किरिट सोमय्यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सातत्यानं आरोप केले आहेत.यामागे शिवसेनेच्याच बड्या नेत्याचा रामदास कदमांचा हात असल्याचा सनसनीखेज खुलासा आता राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.BiG NEWS: Shiv Senas own house breaker! order to break Anil Parba’s office and Ramdas Kadam becomes happy! Three audio clips go viral
दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे राज्य सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आज खेडमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ऑडिओ क्लिपसह पुरावे सादर केले आहे.
कदम यांचे कार्यक्षेत्र असलेल्या रत्नागिरीचे पालकमंत्रीपद परब यांच्याकडे आहे. त्यामुळे रत्नागिरीतच हे शिजल्याचे पुढे आले आहे. या वादावर आता पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय तोडगा काढणार, याविषयी उत्सुकता आहे.
एक माहिती अधिकार कार्यकर्ता परब यांच्याविरोधात किरीट सोमय्यांना सगळी माहिती पुरवतो, कारवाईसाठी पाठपुरावा करतो आणि मग हाच कार्यकर्ता सगळ्या अपडेट्स शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना पुरवतो, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. संजय कदम यांचे आरोप रामदास कदम यांनी फेटाळले आहेत.
ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
ऑडिओ क्लिपमध्ये प्रसाद कर्वे आणि किरीट सोमय्यांचा संवाद आहे. अनिल परब यांचं वांद्र्यातलं कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्यात येणार आहे. न्यायालयानं तसे आदेश दिलेत, असा दोघांमधला संवाद आहे. या आदेशाची प्रत कधी मिळेल अशी विचारणा कर्वे करतात. त्यावर दोन दिवसांत मिळेल, असं उत्तर सोमय्यांनी दिलं आहे. यानंतर हे संभाषण कर्वे रामदास कदमांच्या कानावर घालतात. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना (अनिल परब) राजीनामा द्यावा लागेल, असं कदम म्हणतात. मनसेचे नेते आणि खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या ऑडिओ क्लिप पुढे आणल्या आहेत.
रिसॉर्ट पाडण्यासाठीही कदमांनी पुरवली रसद?
अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टविरोधातही रामदास कदम यांनीच सोमय्यांना रसद पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सोमय्यांनी गुन्हा दाखल केला आहे, असं कर्वे कदमांना फोनवर सांगतात. दिल्लीची टीम रिसॉर्टच्या पाहणीसाठी आली आहे, अशी माहितीदेखील कर्वे कदमांना देतात. त्यावर मग तर आता हा मेला. वाट लागली. कारण ते बांधकाम १०० टक्के सीआरझेडमध्ये येतं, असं कदम म्हणतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App