भारत विकास परिषद व रा.स्व. संघाच्या वतीने पवई, भांडुप मध्ये लसीकरण केंद्र

विशेष प्रतिनिधी

मुंबई  : भारत विकास परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुंबई महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने (S वार्ड ) पवई व भांडुप (प. ) येथे कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. Bharat Vikas Parishad and RSS Vaccination Center at Powai, Bhandup on behalf of the team

पवई येथील आयआयटी मार्केट, श्वेतांबर जैन मंदिर येथे तर भांडुप (प.) येथील महाराष्ट्र नगर हॉल येथे हे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. ६० वर्षांवरील नागरिकांचे सोमवार ते बुधवार या दिवशी नावनोंदणी न करता थेट लसीकरण करता येते. तर ४५ ते ६० या वयोगटातील नागरिकांचे गुरुवार ते शनिवार या दिवशी लसीकरण केले जात आहे.

४५ ते ६० या वयोगटातील नागरिकांना नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. दिवसाला १०० जणांचे लसीकरण करण्यात येत असून या लसीकरण मोहिमेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अधिक माहितीसाठी सीमंत प्रधान (98217 25831) यांच्याशी संपर्क साधावा.



पवई येथे नुकतेच उदघाटन करण्यात आलेल्या या लसीकरण केंद्रात भाजप खासदार मनोज कोटक, पवई चे नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, नगरसेविका वैशाली पाटील, भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजय खेमानी, रा. स्व. संघाचे मुंबई महानगर कार्यवाह संजय नगरकर, पवई नगर संघचालक ऋषिकेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

तर भांडुप (प) येथील महाराष्ट्र नगर येथे सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात भाजप खासदार मनोज कोटक, नगरसेविका जागृति पाटिल, नगरसेविका साक्षी दळवी, भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजय खेमानी, रा. स्व. संघाचे मुंबई महानगर कार्यवाह संजय नगरकर, विक्रोळी भाग संघचालक विश्वनाथ सावंत आणि मुलुंड भाग संघचालक गुरुदास चोपडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Bharat Vikas Parishad and RSS Vaccination Center at Powai, Bhandup on behalf of the team

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात