आज भारत बंद है विरूद्ध हर शहर चालू है; सोशल मीडिया वॉर

भारत बंदच्या निमित्ताने राजकीय पक्षांच्या वॉरच्या बरोबरीने हर शहर चालू है या हॅशटॅगच्या बरोबरीने किंबहुना त्याही पेक्षा जादा फार्म एक्ट गेम चेंजर हा हॅशटॅग ट्विटरवर सुरू आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनात भारत बंदच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष रस्त्सावर उतरले असताना सोशल मीडियात मात्र भारत बंद विरूद्ध हर शहर चालू है या हॅशटॅगचे युध्द सुरू दिसतेय. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदची सुरवात सकाळी ११.०० वाजता झाली असली तरी राजकीय पक्षांनी रेल रोको, रास्ता रोको सकाळी ७-८ वाजल्यापासूनच सुरू केले. त्यानंतर हर शहर चालू है हा हॅशटॅग ट्विटरवर सुरू झाला. त्याला देशभरातून वाढता प्रतिसाद पाहायला मिळतो आहे. Bharat bandh vs har shahar chalu hai

लाज वाचविण्यासाठी ‘भारत बंद’ची जबाबदारी जनतेवर, स्वेच्छेने सहभागी होण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन

भारत बंदच्या निमित्ताने राजकीय पक्षांच्या वॉरच्या बरोबरीने हे ट्विटर वॉरही जोमात सुरू आहे. हर शहर चालू है या हॅशटॅगच्या बरोबरीने किंबहुना त्याही पेक्षा जादा फार्म एक्ट गेम चेंजर हा हॅशटॅग ट्विटरवर सुरू आहे. तो भारत बंदच्या हॅशटॅगच्या बरोबरीने सुरू आहे.

कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या शहरांमध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते बंद करायला बाहेर पडल्याचे दिसले. यात दिल्ली, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब या राज्यांचा प्रामुख्याने सहभाग दिसतोय. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू येथे बंदच्या विरोधात वातावरण असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. हमारा भारत बंद नही है, या घोषणा या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या जात आहेत.

Bharat bandh vs har shahar chalu hai

शेतकरी आंदोलकांमध्ये राजकीय पक्ष घुसल्याचा हा परिणाम असल्याचे दिसते आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलनात आहेत, तर अन्य राज्यांमध्ये राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या नावाखाली आंदोलनात उतरल्याचे दिसते आहे. त्याचेच प्रतिबिंब सोशल मीडियातूनही पडले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात