विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत बंदच्या बातम्या सकाळपासून मीडियाने आपल्या अजेंड्यानुसार चालवताना आणि शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय पक्षांनी “ताब्यात” घेतल्यावर या शेतकरी आंदोलनातून मूळ शेतकरीच हरवेला दिसला. bharat bandh plotical leaders shine
आज सकाळपासून दुपारी ३.०० वाजेपर्यंत भारत बंदच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या. पण त्याचा घटनाक्रम बघता सुरवातीला रेल रोको, रास्ता रोको, मोर्चे, पुतळे जाळणे याच्या बातम्या साधारण तासभर चालल्या. त्यानंतर मात्र, राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी शेतकरी आंदोलनाची अख्खी डिजिटल स्पेस खाऊन टाकलेली दिसली.
यात सोनिया गांधी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी वाढदिवस साजरा करणार नाहीत, ही बातमी काँग्रेसने सोशल मीडियावर जोरदार चालवून घेतली. ट्विटर, इन्स्टावर या बातमीचा शेतकऱ्यांपेक्षा जास्त बोलबाला होता. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नसलेली स्थानबध्दता आप पार्टीने सोशल मीडियावर वाजवून घेतली.
वास्तविक पाहता अरविंद केजरीवालांना घरात स्थानबध्द अजिबात करण्यात आले नव्हते. पण त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपच्या काही आमदारांना त्यांना भेटता आले नाही म्हणून केजरीवाल स्थानबध्दतेत असल्याच्या बातम्या आधी सोशल मीडियावर फिरविण्यात आल्या. नंतर त्या तथाकथित मेन स्ट्रीम मीडियात फिरल्या. तोपर्यंत तास – दीड तास होऊन गेला होता. नंतर दिल्ली पोलिसांनी खुलासा केला, की केजरीवाल मूळातच स्थानबध्दतेत वगैरे काही नाहीत. पण केजरीवालांच्या बातमीतूनही शेतकरी हरवालाच.
नंतर शरद पवारांची पत्रकारांवर झालेली चिडचिड बातम्यांचा विषय ठरली. आधी त्यांनी कृषी सुधारणेसंबंधी लिहिलेले पत्र सोशल मीडियावर फिरले. त्यावरून राष्ट्रवादीची दोन दिवस गोची झाली होती. दस्तुरखुद्द संजय राऊत पवारांच्या पत्रावर खुलासा करायला आले. त्यातून मराठी मीडियाने स्वतःचे समाधान करवून घेतले.
पण पवारांना दिल्लीत त्यावर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर सुरवातीला मुंबई आणि महाराष्ट्रात पवार ज्या स्टाइलने पत्रकारांना “समाधानकारक” उत्तरे देतात त्या स्टाइलने त्यांनी उत्तरे दिली. पण दिल्लीतील पत्रकारांचे प्रश्न थांबलेच नाहीत. त्यामुळे पवार चिडले आणि बातम्या पवारांच्या खुलाशाच्या कमी आणि पवार चिडल्याच्या जास्त झाल्या. यातूनही मूळ आंदोलनकर्ता शेतकरी हरवला तो हरवालच. यानंतर भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझादला पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या बातम्या चालल्या.
अनेक शेतकरी संघटना कृषि कायद्याच्या समर्थनार्थ पुढे, कायदे रद्द करू नका मागणी
१० दिवस आंदोलन चालवले पंजाब आणि हरियाणा शेतकऱ्यांनी. थंडी – वाऱ्यात दिल्लीच्या वेशीवर थांबले शेतकरी. आंदोलनाचा जोर वाढवत नेला शेतकऱ्यांनी. ११ दिवशी त्यात शिरकाव केला, काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी. बातम्या झाल्या नेत्यांच्या आणि यात १० दिवस मेहनत केलेला शेतकरी हरवला तो हरवलाच.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App