लाज वाचविण्यासाठी ‘भारत बंद’ची जबाबदारी जनतेवर, स्वेच्छेने सहभागी होण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन

कृषि कायद्याविरोधात देशभरात होत असलेल्या ‘भारत बंद’ला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, या बंदला प्रतिसाद मिळणार नाही याची कल्पना असल्याने लाज वाचविण्यासाठी आता जनतेवरच जबाबदारी टाकली आहे. जनेतेने स्वच्छेने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कृषि कायद्याविरोधात देशभरात होत असलेल्या ‘भारत बंद’ला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, या बंदला प्रतिसाद मिळणार नाही याची कल्पना असल्याने लाज वाचविण्यासाठी आता जनतेवरच जबाबदारी टाकली आहे. जनेतेने स्वच्छेने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. bharat bandh mahvikas aghadi latest news

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तर या बंदमधून अंग काढून घेतले आहे. भारत बंदमध्ये अनेक राजकीय पक्ष उतरले असले तरी हा कोणताही राजकीय बंद नाही. शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठीचा बंद असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. राजकीय पक्षांनी बंदला पाठिंबा दिला असला, तरी नेहमीसारखा हा राजकीय मागण्यांसाठीचा बंद नाही. बारा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी स्वेच्छेने या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत असल्याचे राऊत म्हणाले.

भारत बंद करून विरोधकांना शेतकर्‍यांचा नव्हे, तर दलालांचं भलं का करायचं आहे?

bharat bandh mahvikas aghadi latest news

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते मुंबईत आंदोलन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच बंदला पक्षाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. सामान्य लोकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे. वास्तविक अनेक व्यापारी संघटनांनी मात्र सरकारला न दुखावण्यासाठी बंदला पाठींबा असल्याचे म्हटले तरी दुकाने बंद ठेवणार नसल्याचे सांगतिले आहे. आंदोलकांमुळे मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी केवळ मोर्चा जात असताना दुकाने बंद करा, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात