भांडारदऱ्यातील “कृष्णांवती” विश्रामगृह कोंबड्यांचे खुराड ; मंत्री, आमदार व खासदाराचे आवडते ठिकाण


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : एकेकाळी राज्यपाल, मंत्री, खासदार, आमदार, राजपत्रित अधिकारी यांचे भंडारदरा येथील “कृष्णावंती” विश्रामगृह आवडीचे ठिकाण होते. तेथे त्यांची यांची बडदास्त ठेवली जात होती. मात्र, घाटघर प्रकल्प पूर्ण झाला आणि विश्रामगृहाकडे दुर्लक्ष झाले. हे विश्रामगृह आता कोंबड्याचे खुराड बनले आहे. सध्या ते उंदरा -मांजरांच आणि कुत्र्याचे राहण्याचे ठिकाण बनले आहे. Bhandardara Rest House “Krishnavanti” is Ignored by Government Officers; Now it is a Chickens House

लाखो रुपये खर्च करून “कृष्णांवती” हे सुंदर, असे विश्रामगृह बांधण्यात आले होते .मात्र घाटघर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याकडे संबधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही.त्यामुळे ही वास्तू मोडकळीस आली आहे.

घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी हे विश्रामगृह जलसंपदा विभाग अहमदनगर यांना वर्ग केले.त्यांनीही त्याचे नूतनीकरण केले नाही. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने ही वास्तू आम्हाला द्यावी, म्हणून प्रस्ताव केला. मात्र सरकारच्या वेळ काढू भूमिकेमुळे ही वास्तू पडून आहे .पर्यायाने या वस्तूपासून मिळणारा महसूल बुडाला. तर या वास्तुची डागडुची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.

  •  “कृष्णांवती” विश्रामगृह बनले कोंबड्यांचे खुराड
  •  घाटघर प्रकल्प पूर्ण होताच विश्रामगृहाकडे दुर्लक्ष
  • विश्रामगृह जलसंपदा विभाग अहमदनगर यांना वर्ग
  • अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष केल्याने वास्तू मोडकळीस
  • महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाला हवी ही वास्तू
  • सरकारच्या वेळ काढू भूमिकेमुळे ही वास्तू पडून
  • वस्तूपासून मिळणारा महसूल बुडाला
  •  विश्रामगृहाच्या नूतनीकरण आणि डागडुजीची गरज

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती