आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदी वाढवली; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्टपर्यंत कायम


वृत्तसंस्था

नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरची बंदी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. Ban on international flights extended till August 31, SAYS DGCA

ही बंदी सर्व आंतरराष्ट्रीय कार्गो आणि डीजीसीएने मंजूर केलेल्या विमानांना लागू होणार नाहीत. ही बंदी ३१ ऑगस्टच्या रात्री ११ वाजून ५९ मिनीटांपर्यंत लागू असतील.

यापूर्वी, देशातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने ३१ जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घातली होती. पण, आता जारी नवीन आदेशानुसार कार्गो विमानांना आणि मंजूरी दिलेल्या विशेष विमानांना या यादीतून वगळले आहे.

कोरोना महामारीमुळे भारतात २३ मार्च २०२०पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी होती. पण, मे २०२० पासून वंदे भारत अभियान आणि जुलै २०२० पासून ठराविक देशांमध्ये द्वीपक्षीय ‘एअर बबल’ अंतर्गत विशेष विमानांना परवानगी दिली आहे.

‘ एअर बबल’ करार कोणत्या देशाशी

भारताने अनेक देशांसोबत ‘एअर बबल’ करार केला आहे. भारताचा अमेरिका, ब्रिटेन, संयुक्त अरब अमीरात, केन्या, भूतान आणि फ्रान्ससह अनेक देशांसोबत ‘एअर बबल’ करार आहे. या अंतर्गत दोन देशांमधील प्रवासाला परवानगी असेल.

Ban on international flights extended till August 31, SAYS DGCA

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात