भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एका सुवर्णासह सात पदके जिंकली. ही भारताची आतापर्यंतची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.AUTOGRAPH PLEASE: Athletes win medals in Olympics, PM wins their minds; Here is Modi’s special Gamcha … PROUD PRIME MINISTER …
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय दलासाठी नाश्त्याचे आयोजन केले होते.यासह त्यांनी खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी जाण्यापूर्वी काही खास वचनही दिले होते ते देखील त्यांनी पूर्ण केले .थट्टा मस्करी अन् भरभरून प्रेम असा हा ‘नाश्ते पे चर्चा’ कार्यक्रम सोमवारी पार पडला .AUTOGRAPH PLEASE: Athletes win medals in Olympics, PM wins their minds; Here is Modi’s special Gamcha … PROUD PRIME MINISTER …
यानंतर दस्तुरखुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी दुनिया धडपडते त्यांनी ऑलिम्पीकमध्ये पदक जिंकणार्या खेळाडूंचे ऑटोग्राफ घेतले ते देखील त्यांच्या प्रिय कायम चर्चेत असणार्या गमछावर ….
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याचं चुरमाप्रेम लक्षात ठेवत मोदींनी त्याला आणि इतर खेळाडूंनाही चुरम्याचा नाश्ता दिला. यावेळी त्यांनी या चुरमाप्रेमाबद्दलचाच एक किस्साही नीरजला सांगितला.
टोकियो ऑलिम्पिकला गेलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पंतप्रधान मोदींना ऑटोग्राफ केलेली हॉकी सादर केली. भारतीय पुरुष हॉकी संघाने भारतासाठी कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. भारताच्या हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक जिंकले आहे.
टोकियोला जाण्यापूर्वी पीएम मोदी पीव्ही सिंधूला म्हणाले होते की, टोकियोमध्ये तुमच्या यशानंतर मी तुमच्यासोबत आइस्क्रीम खाईन. आज हे वचन पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले आहे.
मोदींचा हा गमछा घातलेला फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे तर हा फोटो येणार्या तरूण पिढीला देखील प्रेरणा देणारा नक्कीच ठरेल .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App